आ. जयकुमार गोरेंचा ‘दुप्पट’ मतांनी पराभव करणार, सर्वपक्षीय बैठकीत नेत्यांचा निश्चय

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत माण-खटाव मतदारसंघाचे काँग्रेस आमदार जयकुमार गोरे यांना कोणत्याही परिस्थितीत पाडायचेच, असा निश्चय या मतदारसंघातील सर्वपक्षीय नेत्यांनी व्यक्त केला आहे. आमदार जयकुमार गोरे यांचा दुप्पट मतांनी पराभव करणार, असा इशारा येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत देण्यात आला आहे. आमदार गोरे ज्या कुठल्याही पक्षातून उभे राहतील, तिथे सर्वपक्षीय नेत्यांकडून एकमताने उमेदवार देण्यात येईल असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. जयकुमार गोरे यांना कोणत्याही परिस्थितीत पाडण्याचे सर्वपक्षीय नेत्यांनी ठरवल्यामुळे येणारी विधानसभा निवडणूक जयकुमार गोरे यांना चांगलीच जड जाण्याची शक्यता आहे.

साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या बैठकीला भाजपाचे माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रभाकर घार्गे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई, शिवसेनेचे रणजितसिंह देशमुख, रासपचे जिल्हाध्यक्ष मामू शेठ विरकर, डॉ. संदीप पोळ, वडूजचे नगरसेवक अनिल माळी यांची प्रमुख उपस्थिती होती.

काँग्रेसकडूनच लढवणार निवडणूक

जयकुमार गोरे यांनी माढा लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले होते. त्याच आमदार गोरे यांची काँग्रेसने विधीमंडळातील प्रतोद म्हणून नेमणूक केली होती. त्यामुळे गोरे काँग्रेसमध्ये राहणार हे निश्चितच आहे. तसेच ते विधानसभेसाठी माण-खटाव मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार असतील हे जवळपास निश्चित झाले आहे.

भाजपात जाणार नाही – गोरे

आपण भाजपमध्ये जाणार नसल्याचे विजयकुमार गोरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले होते. भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये गोरे भाजपमध्ये येण्यास धडपडत असल्याचे बोलले जात होते. त्यावर गोरे यांनी जोरदार टीका केली होती. त्यामुळे गोरे यांचा देखील भाजपमध्ये जाण्याचा कोणताही मनोदय नसल्याचे दिसून आले. परंतु, राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीत झालेली चर्चा गोरे यांच्यासाठी अडचण निर्माण करणारी ठरू शकते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गोरेंविरोधात भूमिका

मान-खटाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी गोरे यांच्याविरुद्ध भूमिका घेणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या उमेदवाराविरुद्ध भूमिका घेतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते गोरे यांच्यावर नाराज आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत गोरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साथ तर मिळणार नाहीच त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गोरेंना निवडणुकीत पाडण्यासाठी प्रयत्नशील असेल.

आरोग्यविषयक वृत्त

लिंबू पाणी पिण्याचे ‘हे’ ७ फायदे

पेनकिलर ऐवजी ‘हे’ घरगुती उपाय करा, तत्काळ ‘रिलीफ’ मिळेल

पोटदुखीसह त्वचा आणि केसांच्या समस्यांवर ‘हे’ गुणकारी औषध, जाणून घ्या

‘ही’ ४ झाडे विविध आजारांवर उपयोगी, जाणून घ्या

‘हा’ योगा केल्याचे ४ फायदे, वेळोवेळी पाणी पिण्याची नाही गरज

‘हे’ उपाय केल्याने चेहरा होईल ‘चमकदार’ ; फेशिअलची गरज नाही

अनेक आजारांवर प्राचीन काळातील ‘हे’ २४ ‘रामबाण’ उपाय, जाणून घ्या

समृद्ध आरोग्यासाठी ‘शीर्षासन’

तळपायांना होतात हे आजार, जाणून घ्या

उलट्यांचा त्रासाने प्रवास टाळत असाल तर करा ‘हे’ ४ उपाय