मुंबईतील दुकाने सम-विषम फार्म्युल्याने दुपारी 2 पर्यंत सुरु राहणार, महापालिकेकडून वेळापत्रक जारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार आता नियंत्रणात आला असल्याने राज्य सरकारने काही ठिकाणी लॉकडाऊनमधील निर्बंध शिथील केले आहेत. ‘ब्रेक दि’ चेन या मोहिमेंतर्गत मुंबईतील सर्व दुकानं (Shops in Mumbai) सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत सुरु ठेवण्यास महापालिका प्रशासनाने परवानगी दिली आहे. मात्र, ही दुकाने  सम-विषम तारखेप्रमाणे सुरु राहणार आहेत. रस्त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूची दुकाने एकदिवसाआड सुरु राहणार आहेत. पालिकेने त्याप्रमाणे वेळापत्रक तयार केले आहे. तर शनिवार आणि रविवार हे दोन दिवस सर्व दुकाने बंद राहणार आहेत.

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी 23 एप्रिलपासून संपूर्ण राज्यासह मुंबईत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. मात्र, कोविडचा पॉझिटीव्हीटी दर 10 पेक्षा कमी असलेल्या महापालिकेच्या हद्दीत शिथिलता आणण्याचे अधिकार संबंधित पालिकांना देण्यात आले आहेत. त्यानुसार मुंबई महापालिकेने सोमवारी सुधारित नियमावली जाहीर केली आहे. आतापर्यंत अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरु होती. मात्र, आता यामध्ये वेळ वाढवण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेतील दुकानांसह सर्व दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत सुरु राहतील.

दुकानाचे वेळापत्रक

पहिला आठवडा – रस्त्याच्या उजव्या बाजूची दुकाने सोमवार, बुधवार व शुक्रवारी सुरु राहतील.
डाव्या बाजूची दुकाने मंगळवार, गुरुवार अशी दोन दिवस सुरु राहतील
पुढील आठवडा – रस्त्याच्या डाव्या बाजूची दुकाने सोमवार, बुधवार व शुक्रवारी सुरु राहतील. उजव्या बाजूची दुकाने मंगळवार आणि गुरुवार सुरु राहतील.

वेळ – सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत

– मॉल आणि मल्टिप्लेक्स सुरु करण्याबाबत निर्णय मात्र लांबवणीवर टाकण्यात आला आहे. याबाबत राज्य सरकार निर्णय घेणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

– ई-कॉमर्स अंतर्गत अत्यावश्यक वस्तू बरोबर वस्तूंची वितरण करण्यास परवानगी असणार आहे.

– मात्र सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क वापर दुकानदारांमध्ये अनिवार्य असणार आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे संकेत महापालिकेने दिले आहेत.

READ ALSO THIS :

Not OUT 100 : वृद्ध दाम्पत्यांनी एकत्र दिला कोरोनाशी लढा, घरीच उपचार घेऊन अवघ्या 12 दिवसात केली मात

परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणी ‘या’ कारणामुळं वाढणार ?

नवाब मलिकांचा मोदी सरकावर हल्लाबोल, म्हणाले – ‘7 वर्षे निव्वळ स्वप्ने दाखवली, पण एकही पूर्ण केलं नाही’

Pune : राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा नेत्यावर गोळीबार, फायरिंगच्या घटनेने प्रचंड खळबळ