शरद पवारांनी विधिमंडळाबाहेर केलं ‘असं’ काही, दुसरा कोणताही ‘जाणता’ राजकारणी करूच शकत नाही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांची आज जयंती आहे. या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आपल्या पक्षाच्या आमदारांसह विधानभवनात आले होते. यावेळी आमदारांसह फोटो काढताना एक अनोखी घटना घडली. यावेळी पवारांच्या एक कृतीमुळे सर्वजण पवारांचे फॅन झाले.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. त्यानंतर सरकार स्थापनेच्या हलचालींना वेग आला आहे. या घडामोडींवरुन स्पष्ट होत आहे की राज्यात महाशिवआघाडी सत्तास्थापन करेल. या दरम्यान शरद पवार यांनी आज विधानभवनात जाऊन वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले. यावेळी फोटोग्राफर्सने आमदारांसह ग्रुप फोटो काढण्याची विनंती पवारांना केली. शरद पवार देखील यासाठी तयार झाले.

पवारांनी फोटो काढण्यास परवानगी दिल्यानंतर अचानक त्यांचे लक्ष कोपऱ्यात उभ्या असलेल्या विधानभवानाच्या सुरक्षा रक्षकाकडे गेले. त्यावेळी पवारांनीच या सुरक्षा रक्षकाला फोटो काढण्यासाठी बोलावून घेतले. यानंतर पवारांच्या या कृतीची चर्चा सुरु झाली. सध्या आमदारांमधील या सुरक्षा रक्षकाचा फोटो सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

Visit : Policenama.com 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like