पाथरी तालुक्यात सर्वदूर पाऊस

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – पाथरी तालुक्यात 21 जुन रोजी पहाटे दोन वाजताच्या दरम्यान पावसाने हजेरी लावली. आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्याना शनिवार पडलेल्या पावसाने मोठा दिलासा मिळाला. गतवर्षी जुन महिन्याच्या सुरवातीलाच पावसाने दडी मारली होती. यंदा मात्र आर्द्रा नक्षत्रात सुरवातीलाच लागवडी योग्य पाऊस झाला. शेतकर्‍यांनी कापुस लागवडीला सुरूवात केली आहे.

21 जुन रोजी शनिवारी पडलेल्या 7 मिली मिटर पावसाची तहसील कार्यालयाने नोंद घेतली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यानी कापुस लागवडीला प्राधान्य दिले आहे.

मागच्या काही वर्षांत मृग नक्षत्रात पाऊस पडण्याचे प्रमाण तालुक्यात कमी झाले आहे. त्यामुळे खरीप हंगामाच्या पेरणीला विलंब होत आहे. यंदाही मात्र मृग नक्षत्र कोरडे गेले. मृग नक्षत्र बदलून 21जुनला आर्द्रा नक्षत्राला सुरुवात झाली. लागलीच अपेक्षित असा पाऊस पडला.

अपेक्षित असा पाऊस पडल्याने तालुक्यातील शेतकऱ्यानी कापुस लागवडीला सुरूवात केली. यंदाच्या खरीप हंगामात शेतकरी कापुस लागवडीला प्राधान्य देत आहे. यावरून यंदा कापसाचे क्षेत्र वाढेल असा अंदाज आहे.

पाथरी तहसील कार्यालयातुन मिळालेल्या माहितीनुसार 21 जुन रोजी पडलेल्या पावसाची 7 मिली मिटर नोंद झाली आहे. दरम्यान या पडलेल्या पावसामुळे पाणी टंचाई अध्याप कमी झाली नाही.

आरोग्य विषयक वृत्त

प्रदूषणापासून करा ” केसांचा ” बचाव

तोंडाला चव येण्यासाठी करा ‘हे’ उपाय

एक रामबाण उपाय जो तुम्हाला म्हातारपणीही देतो तारूण्याचा अनुभव

अर्धवट झोपेमुळे होऊ शकतो व्यायामावर परिणाम