खुशखबर ! आता मराठीसह सर्वच ‘प्रादेशिक’ भाषेत होणार ‘टपाल’ विभागाच्या परिक्षा

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – केंद्रीय संचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी राज्यासभेत माहिती देताना सांगितले की डाक विभागाची १४ मे ला होणारी परिक्षा रद्द करण्यात आली असून आता ही परिक्षा सर्व प्रादेशिक भाषांमध्ये होणार आहे. या आधी ही परिक्षा केवल इंग्रजी आणि हिंदी मध्ये आयोजित करण्यात आली होती, ज्याचा आण्णा द्रुमक, द्रमुक, वामदल, काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस या पक्षाच्या सदस्यांनी याला कठोर विरोध केला होता. या सततच्या गोंधळात संसद चार वेळा स्थगित करण्यात आली. त्यामुळे आता मराठीसह सर्वच प्रादेशिक भाषेत टपाल विभागाच्या परिक्षा घेण्यात येणार आहेत.

चार वेळा संसद स्थगित करण्यात आल्याने पुन्हा सुरु झाल्यावर रविशंकर प्रसाद यांनी सांगितले की, त्यांनी डाक विभागाची १४ मे ला आयोजित परिक्षेवर चर्चा करुन परिक्षेला रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. ते म्हणाले की ते संसदेत सदस्यांना आश्वासन देऊ इच्छितात की, आता ही परिक्षा सर्व प्रादेशिक भाषामध्ये घेण्यात येईल. या निर्णयाचे सर्वांनी स्वागत केली आहे.

माकपने के टी रंगराजन यांनी मागणी केली की फक्त डाकचीच नाही तर सर्व केंद्रांतील नोकऱ्यांसाठी प्रादेशिक भाषेत परिक्षा घेण्यात याव्यात.समाजवादी पार्टी के रामगोपाल यादव यांनी मागणी केली की भोजपूरीला संविधानाच्या आठव्या अनूसूचीत सहभागी करुन घेण्यात यावे.
यामुळे आता डाक विभागाची परिक्षा देणाऱ्या उमेदवारांना आपल्या भाषेत परिक्षा देण्यात येणार आहे. ही परिक्षा आता प्रादेशिक भाषेत देता येऊ शकते.

आरोग्यविषयक वृत्त

गरोदरपणात ‘हे’ ४ ब्युटी प्रॉडक्ट कधीही वापरू नका

भाजलेल्या ठिकाणी चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी

जाणून घ्या गुणकारी आवळ्याचे फायदे

‘हाफकिन’मध्ये किफायतशीर औषधांची होणार निर्मिती

‘ग्रीन टी’ प्रमाणात घ्या… नाहीतर उद्भवू शकतात ‘या’ समस्या

मोडलेल्या हाडावर ‘गरम’ वस्तू टाकल्यास होईल नुकसान ; घ्या काळजी

चॉकलेट वॅक्सचे ‘हे’ फायदे, जाणून घ्या

पोटाची चरबी कमी न होण्याची ‘ही’ ९ मोठी कारणे, त्यासाठी ‘हे’ करा

वजन कमी करण्यासाठी ‘हे’ खाऊ नका

मासिक पाळीच्या दरम्यान विचार पूर्वक निवडा वापरण्यात येणारी साधने

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like