‘काला’ साठी ‘ ऑल द रजनी फॅन्स’ चा कल्ला 

चेन्नई : वृत्तसंस्था

रजनीकांतचा बहुप्रतीक्षित ‘काला’ आज अखेर प्रदर्शित झाला. अनेक वाद विवादनानंतर हा चित्रपट आज चेन्नईत रिलीज झाला असून ऑल द राजनी फॅन्स चा एकच कल्ला चेन्नईतील चित्रपट गृहाबाहेर पाहायला मिळाला. यानिमित्ताने रजनीकांत यांची लोकप्रियता किती आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. त्यांच्या चित्रपटांसाठी चाहत्यांमध्ये नेहमीच उत्साह असतो. चेन्नईतील रोहिनी चित्रपटगृहात पहाटे ४ वाजता पहिला शो ठेवण्यात आला होता. या शोसाठी चाहत्यांनी चित्रपटगृहाबाहेर तुफान गर्दी केली होती.

याआधी ‘काला’ या चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. बुधवारी न्यायालायने याचिका फेटाळल्याने चित्रपटाचा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला होता. न्या. आदर्शकुमार गोयल व न्या. अशोक भूषण यांनी चित्रपट निर्माता के. एस. राजशेखरन यांची याचिका फेटाळली. या चित्रपटाची कथा, गाणी व दृश्ये हे सगळे काम माझेच होते असा दावा त्यांनी केला होता. ‘काला’ हा चित्रपट रजनीकांत यांचा जावई अभिनेते धनुष याने निर्मिती केलेला असून, वंडरबार फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेडच्या या चित्रपटाचे दिग्दर्शक पा. रणजिथ आहेत. हा चित्रपट आधी लांबणीवर टाकण्यात आला होता. अखेर आज चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तामिळनाडू येथे काला चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पार्शवभूमीवर चाहत्यांचा पोस्टर ला दुग्धाभिषेक ,फटाके फोडून जल्लोष