त्यांना फक्त खुर्ची हवी, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे गोडवे गाणाऱ्यावर आता ही वेळ : सुधीर मुनगंटीवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे आमदार आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता महाविकासआघाडीवर विरोधक सडकून टीका करत आहेत. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील महाविकासआघाडीवर निशाणा साधला. त्यांनी फक्त खुर्ची पाहिजे अशी खोचक टीका मुनगंटीवार यांनी महाविकासआघाडीवर केली.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले की सत्तारांनी राजीनामा दिले हे काही आश्चर्य नाही बीज बोयोगे बबुल के तो बेर कहा से आयेगा, जनतेशी त्यांचे काहीही घेणे देणे नाही, राज्याचा विकासाचा विचार ते करत नाहीत. त्यांना फक्त हवी खुर्ची. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे गोडवे गाणाऱ्यावर आता ही वेळ आली आहे. आधी मुंबईच्या मातोश्रीवरुन सूत्र हलायची पण आता दिल्लीच्या मातोश्रीवरुन सूत्र हलतात, हे सरकार जन हितासाठी नाही अशी खोचक टीका मुनगंटीवार यांनी महाविकासआघाडीच्या सरकारवर केली.

आम्हाला भात्यातील बाण काढायला लावू नका –
कर्नाटक पॅटर्न त्यांनी कर्नाटकात राबवला, ज्यात त्याना यश मिळालं, पण ते महाराष्ट्राला ओळखत नाहीत. शिवसेनेचे सर्व आमदार हे शिवसेनेचे कट्टर समर्थक, कट्टर शिवसैनिक आहेत. यातला एकही आमदार फुटणार नाही याची शिवसेनेला खात्री आहे. त्यांनी जे प्रयोग केले ते सत्तेत असताना केले, आता सत्ता शिवसेनेकडे आहे. आमच्या भात्यातील बाण जर आम्ही सोडले तर त्यांचे किती लोक घायाळ होतील याचा अंदाज आम्हाला देखील आहे, त्यामुळे जुने मित्र म्हणून आम्ही भाजपला सल्ला देतो की भाजपने फोडाफोडीच्या राजकारणात जाऊ नये असे म्हणत अनिल परब यांनी भाजपला खोचक टोला लगावला. परंतु अर्जुन खोतकर यांनी दावा केला आहे की अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला नाही. परंतु अद्याप हे स्पष्ट नाही की अब्दुल सत्तार आता पुढे काय भूमिका घेणार.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/