डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी ‘त्या’ 3 महिला डॉक्टरांची रवानगी पोलीस कोठडीत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तीनही महिला डॉक्टरांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले. तेव्हा न्यायालयाने त्यांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

डॉ. भक्ती मेहर, डॉ. हेमा आहुजा, डॉ. अंकिता खंडेलवाल, अशी तिघींची नावे आहेत.

डॉ. पायल तडवी या टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि बीवायएल नायर हॉस्पिटलमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या स्त्री रोग विभागात शिक्षण घेत होत्या. त्यावेळी त्यांच्या सिनीयर डॉ. हेमा आहुजा, डॉ.भक्ती मेहेरे आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या तिघींनी त्यांना वारंवार मानसिक त्रास दिला आणि अपमानित केले.

तत्पुर्वी त्यांनी महाविद्यालय प्रशासन, मंत्रालय याठीकाणी धाव घेतली होती. त्यानंतर याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे त्या तिघींच्या त्रासाला कंटाळून पायल तडवी यांनी हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर आग्रीपाडा पोलीस ठाण्यात या तीन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर पोलीसांनी कारवाई करत डॉ. भक्तीला अटक करण्यात आली. मात्र इतर दोघी फरार होत्या. त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर न्यायालयाने त्यांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.