सर्वच इच्छुक यंदा उभे राहिले गणपतीच्या दारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन 

यंदाच्या गणेशोत्सवात सर्वच पक्षातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेले उमेदवार गणपतीच्या मांडवात हजेरी लावताना दिसून आले.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’24939d56-be43-11e8-9aad-c91825fee4cc’]

येत्या काही महिन्यातच लोकसभा आणि त्यापाठोपाठ विधानसभांच्या निवडणुका होणार आहेत . कदाचित दोन्ही निवडणुका एकत्रित होण्याची सुध्दा शक्यता आहे . त्यामुळे चार वर्षात मतदारसंघात न फिरकलेल्या लोकप्रतिनिधींपासून झाडून सारे इच्छुक गणपती मंडळाशी संपर्क साधून होते . काहींनी तर निमंत्रणाची वाटही न पहाता ‘ घुसखोरीं केली. मांडवात जाऊन लोकांची विचारपूस केली , अगदी ओळखी काढून गप्पा मारल्या , छायाचित्रे काढली आणि फेसबुकवर टाकली. या भेटीगाठींमुळे मंडळांना देणग्या अनपेक्षितपणे मिळाल्या . मंडळांच्या भेटीगाठींसाठी इच्छुकांनी पद्धतशीर नियोजन केले होते.

विसर्जन मिरवणुकीनिमित्त उद्या (रविवारी) शहरातील प्रमुख सतरा रस्ते बंद


२०१४च्या निवडणुकी अगोदर गणेशोत्सवात राजकीय मंडळींची गर्दी दिसली नव्हती. कारण त्यावेळी मोदी लाट असल्याने भाजपवाले निर्धास्त होते तर मतदारांना काँग्रेसने गृहित धरले होते. यंदा मात्र लढत अटीतटीची होण्याची शक्यता असल्याने आणि या वास्तवाचे भान आल्याने गणपतीचा आशीर्वाद घेण्याची धडपड दहा दिवस झाली .