RBI नं जाहीर केली 30 टॉपच्या ‘कर्ज’ बुडव्यांची यादी, ‘हे’ 10 अव्वलस्थानी, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रिझर्व बँकने 30 विलफुल डिफॉल्टर्स (कर्जबुडवे) यादी जाहीर केली आहे. चार वर्षापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय बँकांना सर्व विलफुल डिफॉल्टर्सची यादी सादर करण्याचे निर्देश दिले होते. विलफुल डिफॉल्टर म्हणजे मुद्दामून कर्ज न फेडणारे. सोप्या शब्दात सांगायचे तर व्यक्ती किंवा कंपनी कर्ज फेडण्या लायक रक्कम आहे परंतू ते बँकेचे हप्ते देत नाहीत आणि बँक त्यांच्या विरोधात न्यायालयात गेली आहेत असे. अशांनी विलफुल डिफॉल्टर म्हणले जाते.

मेहुल चोकसीच्या तीन कंपन्या विलफुल डिफॉल्टर्सच्या यादीत –
आरबीआयद्वारे एका माहिती आधिकारात देण्यात आलेल्या उत्तरात 30 विलफुल डिफॉल्टर्सच्या यादीत 3 कंपन्या देशातील बँकांना चुना लावून पळालेल्या मेहुल चोकसी यांच्या आहेत. माहिती आधिकारातील माहितीनुसार एक वृत्ताने सांगितले आहे की या तीन कंपन्यांद्वारे एकूण डिफॉल्टची रक्कम 50,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. यात बँकेद्वारे रिट ऑफची रक्कमेचा देखील समावेश आहे.

1. गीतांजली जेम्स लिमिटेड – 5044 कोटी रुपये कर्ज
2. आरईआय अग्रो लिमिटेड – 4197 कोटी रुपये कर्ज
3. विनसम डाइमंड अ‍ॅण्ड ज्वेलरी लिमिटेड – 3386 कोटी रुपये कर्ज
4. रुचि सोया इंडस्ट्रीज – 3225 कोटी रुपये कर्ज
5. रोटोमॅक ग्लोबल – 2844 कोटी रुपये कर्ज
6. किंगफिशर एअरलाइन्स – 2488 कोटी रुपये कर्ज
7. कुडोस केमी लिमिटेड – 2326 कोटी रुपये कर्ज
8. जूम डेवल्पर्स – 2024 कोटी रुपये कर्ज
9. डेक्कन क्रोनिकल – 1951 कोटी रुपये कर्ज
10. एबीजी शिपयार्ड – 1875 कोटी रुपये कर्ज

या प्रमुख कंपन्यांच्या नावाचा समावेश –

या 30 विलफुल डिफॉल्टर्सच्या यादीत गीतांजली जेम्स, रोटोमॅक ग्लोबल, जूम डेवलपर्स, डेक्कन क्रॉनिकल होल्डिंग्स, विनसम डायमंड्स, सिद्धी विनायक लॉजिस्टिक्सच्या नावाचा समावेश आहे.
वृत्तानुसार मागील 5 वर्षात कोणत्याना कोणत्या कारणाने सीबीआय आणि सक्तवसुली संचलनालय यांनी या कंपन्यांना आणि त्यांच्या प्रमोटर्सच्या विरोधात केस दाखल केल्या आहेत. आरबीआयद्वारे जाहीर करण्यात आलेल्या यादीचे स्त्रोत केंद्रीय बँकिंग डेटाबेस सेंट्रल रिपॉजिटरी ऑफ इन्फॉर्मेशन ऑन लार्ज क्रेडिट्स (CRICL) आहे.

Visit : Policenama.com