लिव्ह-इन-रिलेशनमध्ये राहणार्‍या विवाहित महिलेला हायकोर्टाकडून झटका, सुरक्षा याचिका फेटाळली आणि ठोठावला दंड

प्रयागराज : वृत्त संस्था – अलाहाबाद हायकोर्ट (Allahabad High Court) ने विवाहित असूनही लिव्ह इन रिलेशन (Live in Relation) मध्ये राहात असलेल्या महिलेला संरक्षण देण्यास नकार देत तिची याचिका फेटाळून लावली.
यासोबतच अलाहाबाद हायकोर्टा (Allahabad High Court) ने या महिलेला पाच हजार रूपयांचा दंड सुद्धा केला आहे.
हा आदेश जस्टिस के. जे. ठाकर आणि जस्टिस दिनेश पाठक यांच्या खंडपीठाने दिला आहे.
(allahabad allahabad high court refuses to give protection to married woman living in live in nodark)
Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

हायकोर्टाने म्हटले की, आम्ही अशा लोकांना संरक्षण देण्याचा आदेश देऊ शकतो का, ज्यांनी दंड विधान आणि हिंदू विवाह कायद्याचे उघड उल्लंघन केले आहे?
कलम 21 सर्व नागरिकांना जीवनाच्या स्वातंत्र्याची हमी देते, परंतु हे स्वातंत्र्य कायद्याच्या कक्षेत असावे, तेव्हाच संरक्षण मिळू शकते.

असे आहे पूर्ण प्रकरण

यूपीच्या अलीगढच्या गीताचे म्हणणे आहे की, ती आपल्या मर्जीने पतीला सोडून दुसर्‍या व्यक्तीसोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहात आहे.
पती आणि त्याच्या कुटुंबातील लोक तिच्या शांततापूर्ण जीवनात हस्तक्षेप करत आहेत, यासाठी त्यांना असे करण्यापासून रोखण्यात यावे आणि याचिकाकर्तीला सुरक्षा दिली जावी.

हायकोर्टाने म्हटले की याचिकाकर्ती कायदेशीर प्रकारे विवाहित महिला आहे, ती कोणत्या तरी कारणामुळे आपल्या पतीपासून वेगळी होऊन दुसर्‍या व्यक्तीसोबत राहात आहे. अशा स्थितीत तिला कलम 21 चा लाभ दिला जाऊ शकतो का?

यासोबतच हायकोर्टाने म्हटले की, जर महिलेच्या पतीने निसर्गाविरूद्ध जाऊन गुन्हा केला असेल (377 आयपीसी अंतर्गत) तर महिलेने या अनैसर्गिक कृत्याविरोधात कधीही एफआयआर दाखल केलेला नाही. कोर्टाने संरक्षण देण्यास नकार देत याचिकाकर्तीला पाच हजार रुपयांचा दंड केला आणि दंडाची रक्कम राज्य विधी सेवा प्राधिकरणात जमा करण्याचे निर्देश दिले आहेत.
allahabad allahabad high court refuses to give protection to married woman living in live in nodark
Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

हे देखील वाचा

प्रसिद्ध चितळे दुधात काळ्या रंगाचा पदार्थ सापडल्याचे सांगत ‘ब्लॅकमेल’; 20 लाख रुपयांची खंडणी उकळल्या प्रकरणी तिघांना अटक

Pune News | गावकर्‍यांना अंधारात ढकलून डीपीमधील 700 किलो तांब्याच्या तारा चोरणारे चोरटे अटकेत

नारायण राणेंचा CM ठाकरेंना थेट सवाल, म्हणाले – ‘मुख्यमंत्री, हीच का उपकाराची परतफेड?’