खुशखबर ! ‘या’ 3 बँकेत अकाऊंट असेल तर आजपासून कमी होणार तुमचा EMI, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इलाहाबाद बँकने अनेक मॅच्युरिटी पीरियडच्या व्याज दरात 0.05 टक्क्यांची कपात केली होती. हे नवे दर आजपासून (14 फेब्रुवारी) लागू होतील. बँकेने BSE ला सांगितले की सध्याच्या MCLR ची समिक्षा केली आणि परिपक्वता (मॅच्युरिटी) कालावधीच्या कर्जासाठी यात 0.05 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

काय आहेत नवे दर –
बँकेने सांगितले की एक वर्षाच्या मॅच्युरिटी पीरियडसाठी कर्जाचा MCLR आता 8.30 टक्कांनी कमी करुन 8.25 टक्के केला आहे. या प्रकारे 1 दिवस, 3 महिने आणि 6 महिन्यांचे MCLR कमी होऊन 7.75 ते 8.10 टक्क्यांदरम्यान करण्यात आला आहे. एका महिन्याच्या परिपक्वता कालावधीच्या कर्जाचा MCLR बदलण्यात आला नाही.

एसबीआयने 10 फेब्रुवारीपासून केली कपात –
एसबीआयने यापूर्वी MCLR मध्ये 0.05 टक्क्यांनी कपात केली होती. हा दर 10 फेब्रुवारीपासून लागू केला आहे. एसबीआयने लागोपाठ 9व्यांदा MCLR मध्ये कपात केली आहे. या कपातीनंतर विविध मॅच्युरिटी परियडच्या कर्जावरील MCLR कमी करुन 7.85 टक्के करण्यात आला होता.

बँक ऑफ बडोदाने देखील केली होती कपात –
एसबीआयनंतर बँक ऑफ बडोदाने देखील माहिती दिली की विभिन्न मॅच्युरिटीच्या कर्जावर 7.65 टक्कांवरुन 7.60 टक्के कपात केली आहे. स्टॉक एक्सचेंज फायलिंगमध्ये बँकेने सांगितले की MCLR मध्ये हे नवे बदल 12 जानेवारीपासून लागू केले आहेत. यासह बँकेने एक महिन्यासाठी 7.60 टक्के, तीन महिन्यासाठी 7.80 टक्के, सहा महिन्यांसाठी 8.10 टक्के आणि एक वर्षासाठी 8.25 टक्के केले होते.

कसा निश्चित होतो MCLR –
जेव्हा बँक लेंडिग रेट निश्चित करते, तेव्हा बदलेल्या स्थितीतील खर्च आणि मार्जिनल कॉस्टला देखील कॅलकुलेट करतात. बँकेच्या स्तरावर ग्राहकांना डिपॉजिटवर देण्यात येणारे व्याज सहभागी असते. निगेटिव्ह कॅरी ऑन सीसीआर देखील सहभागी असतो, तसेच याच ऑपरेशन कॉस्ट आणि टेन्योर प्रीमियम देखील सहभागी असतो.