‘लाऊडस्पीकर’द्वारे ‘अजान’ देणं हा इस्लामचा धार्मिक भाग नाही : अलाहाबाद उच्च न्यायालय

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : अलाहाबाद उच्च न्यायालयाने मशिदीतून अजान प्रकरणी महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. कोर्टाने म्हटले की, हे नक्कीच आहे की, अजान देणे हा इस्लामचा एक धार्मिक भाग आहे. परंतु लाउडस्पीकरवरून अजान देणे हा इस्लामचा धार्मिक भाग नाही. म्हणून मशिदींमधून मोइज्जिन लाऊडस्पीकरशिवाय अजान देऊ शकतात. कोर्टाने म्हटले आहे की ध्वनी प्रदूषणमुक्त झोपेचा अधिकार हा एखाद्याच्या जीवनातील मूलभूत अधिकारांचा भाग आहे. कोणालाही आपल्या मूलभूत हक्कांसाठी इतरांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन करण्याचा अधिकार नाही. जिल्हाधिकारी यांनी त्याचे पालन करावे यासाठी कोर्टाने मुख्य सचिवांना आदेश दिले आहेत.

गाझीपूरचे खासदार अफजल अन्सारी आणि फर्रुखाबादचे सय्यद मोहम्मद फैजल यांची याचिका निकाली काढताना न्यायमूर्ती शशिकांत गुप्ता आणि न्यायमूर्ती अजित कुमार यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. दरम्यान, कोरोना साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी देशव्यापी लॉकडाउन जाहीर केले आहे. उत्तर प्रदेशमध्ये सर्व प्रकारच्या कार्यक्रमांना आणि एकाच ठिकाणी एकत्र येण्यास बंदी घातली आहे. त्यासाठी लाऊडस्पीकर वाजविणे देखील प्रतिबंधित आहे. गाझीपूरच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी मशिदींमधून लाऊडस्पीकर वापरण्यास बंदी घालण्यासाठी तोंडी सूचना दिल्या होत्या. याची गाजीपूर येथील बहुजन समाज पक्षाचे खासदार अफजल अन्सारी यांनी याला विरोध केला. रमजान महिन्यात मशिदींतून लॉउडस्पिकरवरून अजानला परवानगी न देणे धार्मिक स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन असल्याचे सांगत अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना पत्र मिळून हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती. सरन्यायाधीश गोविंद माथूर यांनी जनहित याचिकेचा फॉर्म स्वीकारून सरकारची बाजू मागितली होती. दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने आपला निर्णय सुरक्षित ठेवला होता.

जेव्हा लाऊडस्पीकर नव्हते तेव्हाही होत होती अजान
अलाहाबाद उच्च न्यायालयाने निकालात स्पष्ट केले की, लाऊडस्पीकरद्वारे अजानवरील बंदी बरोबर आहे. कोर्टाने म्हटले की, लाऊडस्पीकर नसतानाही अजान होते. तरीही लोक मशिदीत प्रार्थना करण्यासाठी एकत्र येत असत. अशा परिस्थितीत लाउडस्पीकरमधून अजान थांबविणे हे कलम 25 च्या धार्मिक स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे असे म्हणता येणार नाही.

दुसऱ्यांना जबरदस्तीने एकविण्याचा अधिकार कोणालाही नाही
अलाहाबाद हायकोर्टाच्या मते, अनुच्छेद 21 मध्ये निरोगी जीवनाचा अधिकार दिला जातो. भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य कोणालाही इतरांना जबरदस्तीने एकविण्याचा अधिकार देत नाही. निश्चित ध्वनीपेक्षा जोरात ध्वनी परवानगीशिवाय वाजविण्याची परवानगी नाही. रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत स्पीकरच्या आवाजावर बंदी घालणारा कायदा आहे. कोर्टाच्या निर्णयावर नियंत्रण ठेवण्याचा सरकारला अधिकार आहे.

मुस्लिम धर्मगुरू म्हणाले …
सिटी काझी, जामा मशिद चौक शफीक अहमद शरीफी (मुफ्ती) यांनी सांगितले की, लाउडस्पीकरच्या वापरास रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत आधीच बंदी होती. आम्ही त्याचे अनुसरण करीत आहोत. अलाहाबाद उच्च न्यायालयानेही म्हटले आहे की, अजानवर कोणतेही बंधन नाही. बाकीचे कोर्टाचा निर्णय पाहून निर्णय घेतील. इमाम जुमा चक झिरो रोड शिया जामा मस्जिद हसन रझा जैदी म्हणाले की, हायकोर्टाने म्हंटले की, लाऊडस्पीकर नसतानाही अजान होत असे, यावर मला म्हणायचे आहे की, सुरुवातीला फारसे काही नव्हते. नवीन तंत्रज्ञान आल्यावर त्याचा उपयोग केला जात आहे. उच्च न्यायालयाकडे मागणी आहे की, त्यांनी आपल्या निर्णयावर पुनर्विचार करावा.