उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींवर FIR दाखल, वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाजूने दिला होता निकाल

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. एन शुक्ला यांच्यावर वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाजूने निकाल दिल्याचा आरोप ठेवण्यात आलेला आहे. लखनऊच्या घरी त्यांच्यावर छापे देखील टाकण्यात आले अशा प्रकारची माहिती शुक्रवारी अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सीबीआयने याचप्रकरणी छत्तीसगढ उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश आय. एम. कुद्दुसी, प्रसाद एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष भगवान प्रसाद यादव, पालाश यादव आणि खासगी व्यक्ती भावना पांडे व सुधीर गिरी यांच्यावरही गुन्हा दाखल केला. शुक्ला हे उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाचे न्यायमूर्ती आहेत. २०१७ मध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठीच्या समुपदेशन सत्रातून महाविद्यालयाला वगळण्यात येऊ नये म्हणून तसा आदेश काढण्यासाठी शुक्ला यांंनी फायदा घेतला असे आरोप करण्यात आले होते.

शुक्ला यांनी गैरवर्तन केल्याची माहिती मिळाल्याच्या आधारावर केल्या गेलेल्या प्राथमिक चौकशीवरून सीबीआयने ८ सप्टेंबर, २०१७ रोजी त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्यावर खळबळ उडाली होती.सरन्यायाधीश रंजन गोगोई यांंनी यावर्षी जुलैमध्ये शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास परवानगी दिल्यावर शुक्ला यांच्यावर चार डिसेंबर, २०१९ रोजी सीबीआयने नव्याने गुन्हा दाखल केला. शुक्ला आणि इतरांच्या केलेल्या प्राथमिक चौकशीची माहिती सीबीआयने गोगोई यांना दिली होती.

सीबीआयने शुक्ला यांच्यावर नियमित खटला चालवण्यासाठी परवानगी मागताना प्राथमिक चौकशीवरील छोटी टिप्पणी घटनाक्रमासह सरन्यायाधीशांपुढे ठेवली होती. तत्कालीन सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या निदर्शनास ते प्रकरण आणल्यानंतर त्यांनी प्राथमिक चौकशी सांगितली होती.

न्यायमूर्ती श्री नारायण शुक्ला यांनी त्यांच्या अधिकारांचा गैरवापर करून गुन्हेगारी कटात प्रवेश केला आणि बी. पी. यादव व पालाश यादव यांना आर्थिक लाभ व्हावा यासाठी फायदा घेतला’, असे सीबीआयने एफआयआरमध्ये म्हटले आहे. उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तीवर गुन्हा दाखल करण्यास परवानगी दिली गेल्याची ही पहिलीच घटना असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटल्याचे माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like