Allahabad High Court On Azaan Loudspeakers | उच्च न्यायालयाने मशिदीवरील लाऊडस्पीकरबाबत दिला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Allahabad High Court On Azaan Loudspeakers | राज्यामध्ये भोंगा (Azaan On Loudspeakers) आणि हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) मुद्द्यावरून जोरदार वादंग निर्माण झाला आहे. अशातच अलाहाबाद उच्च न्यायालयाने (Allahabad High Court ) लाऊडस्पीकरच्या वापराबाबत परवानगी देताना संबंधित याचिका (Petition) ही फेटाळून लावली आहे. अजानसाठीच्या वापरासाठी एक याचिका दाखल करण्यात आली होती.

 

बदाऊनच्या बिसौली तहसीलमधील (Bisauli Tehsil) बहवानपूर गावातील नूरी मशिदीच्या मुतवल्ली इरफान (Mutawalli Irfan) यांनी ही याचिका दाखल केली होती.
न्यायालयाने याचिका फेटाळून लावत, मशिदीमध्ये अजानसाठी लाऊडस्पीकरचा वापर मूलभूत अधिकारांतर्गत (Fundamental Rights) येत नाही.

 

न्यायालयाने या प्रकरणात (Loudspeaker Controversy) हस्तक्षेप करण्यास नकार दिला असून त्यासोबतच दाखल केलेली याचिका ही चुकीची ठरवत अर्ज फेटाळून लावला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे.
राज ठाकरे यांनी देशातील सर्व हिंदूंना आवाहन केलं होतं.

 

ज्या ठिकाणी अजान दिली जाईल त्या ठिकाणी डबल आवाजात हनुमान चालिसा लावा.
त्यासोबतच अजान चालू झाली की पोलिसांना याबाबत वारंवार तक्रार करा, असं राज ठाकरे यांनी आवाहन केलं होतं.

 

Web Title :- Allahabad High Court On Azaan Loudspeakers | allahabad high court says use of loudspeakers for azan in mosques is not a fundamental right

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा