कंगनाला अखाडा परिषदेचं समर्थन, म्हणाले – ‘सत्याचा आवाज दाबतेय उध्दव ठाकरे सरकार’

प्रयागराज : वृत्तसंस्था – बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतला अखिल भारतीय आखाडा परिषदेचेही समर्थन मिळाले आहे. आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांनी कंगना रनौतला देशाची कन्या म्हटले आहे. ते म्हणाले की, कंगना रनौत शूर आणि धैर्यवान मुलगी आहे, जिने बॉलिवूड माफिया आणि ड्रग माफियांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. बॉलिवूडमधील एका विशिष्ट समुदायाच्या वर्चस्वाच्या विरोधात तिने धैर्याने आवाज उठवला आहे. यामुळे केवळ बॉलिवूडचे माफियाच घाबरले नाहीत, तर सरकारही घाबरले आहे.

महंत नरेंद्र गिरी म्हणाले की, हेच कारण आहे कि सत्याचा आवाज दाबण्यासाठी उद्धव ठाकरे सरकारने कंगना रनौतच्या कार्यालयावर बुलडोजर चालवला आहे आणि सुडाची कारवाई केली आहे. मात्र महाराष्ट्र उच्च न्यायालयाने कंगना रनौतला मोठा दिलासा देत तोडफोडीच्या कारवाईला स्थगिती दिली आहे. पण सुशांत सिंह हत्या प्रकरणात ज्या बहादुरीने कंगना रनौतने ड्रग आणि बॉलिवूड माफियांचा सामना केला आहे, त्यामुळे लोक घाबरले आहेत.

पालघर हिंसाचाराचीही सीबीआय चौकशी करण्याची मागणी
महंत नरेंद्र गिरी म्हणाले की, महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत खराब आहे. पालघरमध्ये दोन साधूंच्या हत्या प्रकरणात देखील महाराष्ट्र सरकारने कोणती कारवाई केली नाही. ते म्हणाले की, पालघर प्रकरणातही आखाडा परिषदेने सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. ते म्हणाले, कंगना रनौतच्या या लढाईत साधू-संत आणि संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी आहे. तसेच त्यांनी कंगना रनौतला सुरक्षा दिल्याबद्दल हिमाचल प्रदेश सरकारचे आभारही मानले आहे.