मुलांच्या संगोपणाबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय; म्हणाले – ‘मुले ही आईसोबत अधिक सुरक्षित’

पोलिसनामा ऑनलाईन, प्रयागराज : मुलाच्या ताब्यासंदर्भात अलाहाबाद उच्च न्यायालयाने एक मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. उच्च न्यायालयाने सांगितले की, मुले हि आईकडे अधिक चांगले संरक्षित असतात. यांसह कोर्टाने तीन वर्षाच्या मुलाचा ताबा आईकडे देण्याचे निर्देश दिले आहेत. कोर्टाने असेही सांगितले की, मुलांसाठी आई इतर पालकांपेक्षा सर्वात सुरक्षित असते. तसेच कोर्टाने म्हटले आहे की पाच वर्षांपर्यंतच्या मुलाच्या ताब्यात घेण्याचा अधिकार आईकडे आहे.

विशेष म्हणजे, याचिकाकर्ते आयटी अभियंता प्रीती राय यांनी तिच्या साडेतीन वर्षाचा मुलगा अद्वैत याच्या ताब्यात घेण्याची मागणी केली होती. अद्वैत वडील प्रशांत शर्मा आणि आजी आजोबांसमवेत राहत आहे. इथल्या पालकांपैकी कोणा एकाचीही ताब्यात घेणे बेकायदेशीर ठरू शकत नाही, असे म्हणत प्रशांतच्या वकिलांनी याचिकेला विरोध दर्शविला.

’पाच वर्षापर्यंत मूल आईबरोबर सुरक्षित’
निकाल सुनावल्यानंतर न्यायाधीश जे जे मुनीर यांच्या एकल खंडपीठाने म्हटले आहे की, पाच वर्षांपर्यंतच्या मुलाला ताब्यात घेण्याचा अधिकार आईसाठी राखीव आहे. मूल इतर कोणत्याही पालकांपेक्षा आईकडे अधिक सुरक्षित असते. कोर्टाने वडील प्रशांतला मुलाची कस्टडी त्याच्या आई प्रीतीकडे देण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती जे जे मुनीर यांनी सीजेएम गाझियाबाद यांना आपल्या उपस्थितीत आदेशाचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे पाच वर्षांपर्यंतच्या मुलांचे संगोपन हे आईकडे अधिकरित्या चांगले होऊ शकते, असे या निर्णयावरून समजले आहे.