अलाहबादचा प्रोफेसर निघाला दुसरा ‘मौलाना साद’, 30 जमातींना अटक

अलाहाबाद : वृत्तसंस्था – दिल्ली येथील मरकजमधून बाहेर पडलेल्या तबलिगी जमातींमुळे संपूर्ण देशात कोरोनाबाधितांचा आकडा वाढला आहे. मरकजमधील अनेक तबलिगी जमातींमधील अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. या सर्व लोकांचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. या प्रकरणी मरकजचा प्रमुख मौलाना साद याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अलाहाबाद येथील एका प्रोफेसरला जमातींना आणि परदेशी नागरिकांना आश्रय दिल्याच्या आरोपा खाली अटक करण्यात आली आहे. त्याच बरोबर 30 जमातींना देखील पोलिसांनी अटक केली आहे.

Advt.

प्रयागराज पोलिसांनी आतापर्यंत 30 लोकांना अटक केली आहे. यामध्ये शाहगंज पोलिसांनी सात विदेशींसह 17 जणांना अटक केली तर करैली पोलिसांनी 9 विदेशी नागरिकांसह 12 जणांना अटक केली आहे. तर शिवकुटी पोलिसांनी अटक केलेल्या प्रोफेसरचे नाव शाहीद असे असून तो अलाहाबाद विद्यापीठातील राज्यशास्त्राचा प्राध्यापक आहे. परदेशी नागरिकांवर परदेशी कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्या प्रोफेसरला जमातींना छुप्या पद्धतीने आश्रय दिल्याच्या आरोपा खाली अटक करण्यात आली आहे. प्रोफेसर शाहीद याच्यावर साथीच्या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान निजामुद्दीन मरकज येथील तबलिगी जमातमध्ये सहभागी झालेल्या बऱ्याच लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तबलिगी जमातींमुळे देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.