इतिहासात पहिल्यांदाच उच्च न्यायालयाच्या ‘सिटिंग’ न्यायाधीशांवर FIR दाखल होणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायायाधीश रंजन गोगोई यांनी सीबीआयला अहलाबादच्या उच्च न्यायालयातील न्याय‍धीश एस एन शुक्ला यांच्या विरोधात भ्रष्टाचाराविषयी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच असे होत आहे की एखाद्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवर केस करण्यात येईल.

न्यायाशीध जस्टिस एस एन शुक्ला यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. शुक्ला यांनी यूपी मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस प्रवेश प्रक्रियेत आपल्या पदाचा दुरूपयोग केला आहे. त्यांनी खासगी मेडिकल कॉलेजला नफा मिळावा म्हणून २०१७ ते २०१८मध्ये प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलली होती.

त्यानंतर त्याच्यावर न्यायाधीश पदावरून न्यायिक निर्णय़ घेण्यावर बंदी घलण्यात आली आहे. तसंच मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांनी शुक्ला याचा बदलीचा प्रस्तावही नाकारला होता. तसंच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहीत शुक्ला यांना पदावरून हटवण्यासाठी मागणी केली होती.

 

दरम्यान, उत्तर प्रदेशमधील महाअधिवक्ता राघवेंद्र सिंह यांनी २०१७ मध्ये तक्रार दाखल केली होती. तेव्हा माजी मुख्य न्यायाधीश दीप मिश्रा यांनी एका अंतर्गत चौकशी समिती तयार केली होती. या समितीमध्ये मद्रास हाय कोर्टातील  तत्कालीन मुख्य न्यायाधीश इंदिरा बॅनर्जी, सिक्कीम हाय कोर्टाचे चीफ जस्टिस पी के जयसवाल हे होते.

त्यांनी जस्टीस शुक्ला यांनी खरच सर्वोच्च न्यायलयाचा आदेश मोडला की नाही हे समोर आणायचे होते. ते त्यांनी सिद्ध केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करत भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात  आला आहे. त्यावरून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश आता रंजन गोगोई यांनी दिले आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

दिव्यांच्या अमावास्येला ‘अशी’ करा दिव्यांची स्वच्छता

‘या’ गंभीर आजारांपासून सुरक्षित राहण्यासाठी वेळेत करा ‘या’ १० तपासण्या

कॅन्सरसह ‘या’ गंभीर आजारांवर ‘काळे जिरे’ गुणकारी, जाणून घ्या

बॅड कोलेस्टेरॉलसाठी कर्दनकाळ आहेत ‘या’ ७ भाज्या, जाणून घ्या

दुधी भोपळा ‘वरदान’ ठरतयं मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडांच्या रूग्णांसाठी, जाणून घ्या

‘व्होडका’त अनेक औषधी गुणधर्म, विविध समस्यांवर लाभदायक !