भागवताचार्य देवकीनंदन ठाकुर यांच्यावर ‘छेडछाडी’चे आरोप, पोलिस घेणार पिडीतेच्या ‘जबाबा’ची नोंद

वृंदावन : वृत्त संस्था – वृंदावनचे भागवताचार्य देवकीनंदन ठाकुर आणि त्यांच्या भावासह सहा लोकांच्या विरूद्ध गंभीर कलामांखाली दाखल झालेल्या गुन्ह्याच्या प्रकरणात घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी मागवले आहे. सोमवारी हायवे पोलीस अनुसूचित जातीच्या या महिलेचा जाबाब नोंद करून घेणार आहेत.

भागवताचार्य यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल होताच खळबळ उडाली आहे. हायवे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका कॉलनीत राहणार्‍या अनुसूचित जातीच्या कुटुंबाला 24 फेब्रुवारीला घरात घुसून मारहाण करण्यात आली होती. शिवीगाळ आणि जीवे ठार मारण्याची धमकी देऊन महिलेशी छेडछाड सुद्धा करण्यात आली. पीडिेतेच्या तक्रीनुसार हायवे पोलीस घटनास्थळी पोहचण्यापूर्वी आरोपी पळून गेले होते.

पीडितेच्या तक्रारीवर 27 फेब्रुवारीला वृंदावनच्या शांती सेवा धामचे मुख्य ट्रस्टी आणि भागवताचार्य देवकीनंदन ठाकुर, भाऊ विजय शर्मा, गजेंद्र, श्यामसुंदर, अमित आणि धर्मेंद्र यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. सीओ रिफायनरी वरुण कुमार यांनी सांगितले की, घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज मागवण्यात आले आहे. सोमवारी पीडित व्यक्तीच्या पत्नीचा जबाब घेतला जाईल. सर्व पुरावे जमवल्यानंतर आरोपींना अटक करण्यात येईल.