Mumbai News : धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप, मुंबईतील ‘या’ पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे ( dhananjay munde) यांनी बलात्कार केल्याचा आरोप एका नातेवाईक महिलेने केला आहे. या संदर्भात या महिलेने ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. याबाबत ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज एका महिलेने दिला असल्याची माहिती ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद बांगर यांनी दिली. मात्र, पोलिसांनी दखल न घेतल्याने तिने याबाबत मुंबई पोलीस आयुक्त, मुंबई पोलीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ट्वीट करत तिने ही माहिती दिली आहे.

मुंबई पोलीस याबाबत अधिक तपास करत आहे. १० तारखेला याबाबतची तक्रार दिली. ११ तारखेला मुंबई पोलिसांकडून अर्ज स्विकारण्यात आला आहे. २००६ पासून अत्याचार सुरु होते. पुढे बॉलीवूडमध्ये चांगली संधी मिळवून देण्याच्या नावाखाली इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप तिने तक्रारीत केला आहे. तसेच याचे व्हिडीओ काढून धमकावल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्वीट करत मदतची मागणी केली आहे.