आबु आझमींसोबत वाद झाल्यानंतर महिला पोलिस अधिकार्‍याची तडकाफडकी बदली, भाजप नेते म्हणाले – ‘वाह रे ठाकरे सरकार’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमैया यांनी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्या बहाण्याने महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे. किरीट सोमैय्या यांनी गुरुवारी ट्विट केले की, वाह रे ठाकरे सरकार, आमदार अबू आझमीविरुद्ध कारवाई करण्याऐवजी तुम्ही महिला पोलिस अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई केली.

अबू आझमीवर नागपाडा पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ निरीक्षक शालिनी शर्मा यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप असून हा आरोप किरीट सोमय्या यांनी लावला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, आमदार अबू आझमी यांनी नागपाडा पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक शालिनी शर्मा यांच्याशी गैरवर्तन केले. त्यासंबंधित सीसीटीव्ही फुटेजही आहे.

शालिनी शर्मा यांची बदली मुंबईतील चेंबूर पोलिस ठाण्यात केली आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार शालिनी शर्मा यांनी बदलीची मागणी केली होती आणि त्यांची मागणी स्वीकारून त्यांची बदली केली आहे. सपाचे आमदार अबू आझमी यांचा शालिनी शर्मा यांच्याशी वाद झाला होता. किरीट सोमैय्या यांच्यानुसार, अबू आझमीने शालिनी शर्मासोबत गैरवर्तनही केले.

काय आहे पूर्ण प्रकरण?
बुधवारी सकाळी समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नागपाडा जंक्शन येथे आंदोलन केले होते, कारण प्रवाशांना तेथे बोलावले गेले होते. मात्र, गाड्या रद्द झाल्यामुळे पोलिसांनी त्यांना परत पाठवले. या प्रकरणाबद्दल नागपाडा पोलिसांनी सांगितले की, प्रवाश्यांना समजावून सांगत परत पाठवले गेले.

घटनास्थळी आमदार आझमीही पोहोचले. यानंतर त्यांनी लोकांना एकत्र केले आणि निषेध करण्यास सुरवात केली. या दरम्यान, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की अबू आझमी यांनी योग्य भाषा वापरली नाही. अबू आझमी यांनी वापरलेल्या भाषेवर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला होता.