धक्कादायक… ज्योतिष म्हणाला, ‘प्रगतीसाठी मुलगा ठरतोय अडथळा, वडिलाने 5 वर्षांच्या मुलाला दिले पेटवून’

चेन्नई : पोलीसनामा ऑनलाइन –  श्रीमंतीच्या हव्यासापोटी अनेकजण काहीना काहीतरी करत असतात. मग काही जण गुन्हेगारी मार्गाकडे वळतात. असाच प्रकार येथे घडला. रामकी नावाच्या एका व्यक्तीने त्याच्या 5 वर्षांच्या मुलाला जीवंत जाळले. हा मुलगा प्रगतीसाठी अडथळा ठरत असल्याचे एका ज्योतिष्याने सांगितले. त्यानंतर त्याने त्याच्या मुलाला पेटवून दिले.

तमिळनाडूच्या तिरूवरूनर येथे ही घटना घडली. रामकी हा व्यवसायाने रिक्षाचालक होता. तो तंत्र-मंत्रावर विश्वास ठेवत होता. त्यामुळे तो एकदा एका ज्योतिष्याकडे गेला. तेव्हा त्याने प्रगतीसाठी ज्योतिष्याकडे विचारणा केली. त्यानंतर त्या ज्योतिष्याने या व्यक्तीला त्याच्या यशात त्याचा मुलगा बाधा ठरत असल्याचे सांगितले. त्याने नशीब चमकवण्यासाठी ज्योतिष्याचे ऐकून मुलाला संपवण्याचा विचार केला. त्यानंतर त्याने त्याच्या मुलावर पेट्रोल टाकून आग लावली. यामध्ये या मुलाचा मृत्यू झाला.

जीवासाठी बाधा ठरत होता मुलगा

रामकी हा ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवत होता. तो जीवनात प्रगती करू पाहत होता. याच हव्यासापोटी तो ज्योतिष्याकडे गेला. मात्र, जेव्हा त्याला त्या ज्योतिष्याने पाच वर्षांचा मुलगा त्याच्या प्रगतीत अडथळा ठरत असल्याचे सांगितले. तेव्हा त्याने त्याला पेटवून दिले. तसेच या ज्योतिष्याने 15 वर्षे मुलापासून दूर राहावे, असेही सांगितले होते.