भजी विकायची की आंबा खायचा? पहा काय म्हणाले अजित पवार  

पिंपरी: पोलीसनामा ऑनलाइन – आजच्या आधुनिक युगात आंबा खा म्हणजे मुलांना जन्म देऊ शकताल अशी प्रचंड विचित्र पद्धतीने बोलणारे अनेक बौद्धीक दिवाळखोर आहेत. तसेच पंतप्रधान बेरोजगार युवकांना भजी विकण्याचा सल्ला देत आहेत ही बाब म्हणजे त्यांची थट्टा आहे. असा आरोप अजित पवार यांनी केला आहे. युती सरकारच्या चार व र्षाच्या काळात  बेरोजगारांसाठी काहीही करता आलेले नाही असेही अजित पवार यांनी बोलताना सांगितले मोदी सरकारने सत्तेवर येताना दोन कोटी रोजगार दरवर्षी देऊ असे थोतांड आश्वासन दिले होते. ते आश्वासन हवेत विरले का? असाही प्रश्न अजित पवारांनी उपस्थित केला आहे.

मोदी सरकार सगळ्या दिलेल्या आश्वासनांवर अपयशी ठरले आहे. येत्या निवडणुकांमध्ये जनता त्यांना घरी बसवेल. जनतेचे प्रश्न असोत, महिलांचे असोत किंवा युवकांचे प्रश्न असोत कोणताही प्रश्न या सरकारला सोडवण्यात यश आलेले नाही असेही अजित पवारांनी म्हटले आहे.त्याचबरोबर नोटबंदी शेतकरी कर्जमाफी अश्या अनेक फसव्या घोषणांचा ही  त्यांनी यावेळी बोलताना उल्लेख केला हे सरकार साधं शेतकरी आत्महत्या थांबवू शकलेलं नाही अशी खोचक टीका ही अजित पवारांनी बोलताना केली.

पुण्यातील पिंपळे सौदागर भागातील नाना काटे सोशल फाऊंडेशनच्या वतीने शनिवारी सांगवीतील बाबुरावजी घोलप महाविद्यालयात ‘जॉब फेअर’चे उद्‌घाटन अजित पवार यांच्या हस्‍ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते याच कार्यक्रमात त्यांनी भाजपावर टीकेची  तलवार ताणली

२१ व्या शतकात भारताने विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात उत्तुंग झेप घेतली आहे. इस्‍त्रो जगभरातील शेकडो देशांचे उपग्रह भारतातून प्रक्षेपित करते. तर दुसरीकडे प्रतिगामी विचाराची व्यक्‍ती ‘आंबा खाण्याचा’ सल्‍ला देते. अशा विचारवंतांची कीव येते असेही अजित पवार यांनी म्हटले आहे. कीव येते, असे म्‍हणत संभाजी भिडे  यांच्यावर पवारांनी नाव न घेता टीका केली. युवकांना सल्‍ला देताना ते म्‍हणाले, तसेच देशाचे प्रमुख म्हणजे देशाचे पंतप्रधान च बेरोजगारांना भजी विकण्याचा सल्ला देत आहेत यामुळे युवकांनी आशा न सोडता नाउमेद न होता युवकांनी नैराश्य पत्करून व्यसनाधीनतेकडे वळू नाही व आजचा युवक हीच देशाची संप्पती आहे असेही यावेळी पवार बोलले
नुसते फसवे आश्वासन किव्हा नाही ते सल्ले देण्यापेक्षा आता अनेक सरकारी आस्थापनांमध्ये रिक्‍त जागांची संख्या मोठी आहे. पुणे जिल्‍हा शिक्षण मंडळ संचलित विविध शैक्षणिक आस्थापनांमध्ये ५०० जागा रिक्‍त असून रयत शिक्षण संस्थेत २५०० हजार पदे रिक्‍त आहेत. या कडे लक्ष देऊन सरकारने याबाबत धोरण निश्चित करून गुणवत्ता पात्र सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्‍ध करून द्यावा अस पवार म्हणाले