होय हिंदुत्ववादी पक्षाचा मला अभिमान : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपा-सेनाची युती ही फेव्हिकॉलच्या जोडा सारखी असून, ती तोडण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ती तुटणार नाही असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील युती मेळाव्यात केले आहे. आमची झालेली युती फक्त सत्तेसाठी नसून, ही युती एका विचारांची आहे. होय आम्हाला अभिमान आहे आम्ही हिंदुत्ववादी पक्ष आहोत, असं ठाम मत यावेळी मुख्यमंत्र्यानी मांडले

भाजपा -सेना युती झाल्यानंतर प्रथमच अमरावतीत युतीचा मेळावा घेण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. मुंख्यमंत्री म्हणाले की, आमचे हिंदुत्व हे राष्ट्रसाठी, आहे. ज्याला देशावर प्रेम आहे, ते आमचं हिंदुत्व आहे. आमची झालेली युती कोणी कितीही प्रयत्न केले तरी तुटणार नाही. ही युती भविष्यात देखील अशीच टिकणार आहे. ही युती नुसती सत्तेसाठी केलेली नाही,तर तो एक आमचा विचार आहे. असा विश्वासही मुंख्यमंत्री यांनी व्यक्त केला.

आमची ही युती झाल्यामुळे काहींनी निवडणुक लढवण्याची माघार घेतली आहे. असा टोला नाव घेता शरद पवारांनवर मुंख्यमंत्र्यांनी लगावला. युती हा आपला एकच धर्म आहे. निवडणुकीच्या वेळेला जिथे कमळ तिथे कमळ, जिथे धनुष्य तिथे धनुष्य, इतरत्र कुठेच बघायचं नाही असं ही यावेळी मुख्यमंत्र्यांनी बजावून सांगितलं.

ह्याहि बातम्या वाचा –

1 एप्रिलपासून जेवण बनवणं अन् गाडी चालवणं होणार महाग

पोलीस अधीक्षकांच्या गाडीवर स्क्रॅच ; ६ पोलीस कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन

गडकरी यांनी घेतली मनोहर जोशींची भेट

मोठी बातमी ! ‘हिमालय’पूल आता दिसणार नाही