‘युती केली चूक झाली, आता 2024 च्या तयारीला लागा’ ! भाजपाच्या ‘या’ बड्या नेत्यानं कार्यकर्त्यांना सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आमच्याकडून चूक झाली, पुढे युती होणार नाही. जे झालं ते झालं. आता पाच वर्ष पक्षाचे काम वाढवून 2024 च्या निवडणुकीची तयारी करा, अशी सूचना केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांना दिली आहे. शनिवारी पक्षाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

दानवे म्हणाले की , ‘तीन पक्ष एकत्र येऊन किमान-समान कार्यक्रम म्हणत सरकार स्थापनेचा विचार करत आहेत; पण यातील दोन पक्ष विरुद्ध टोकाचे आहेत. सरकार बनवणे इतके सोपे नाही. शिवसेनेने जनमताचा आदर करावा, जनमताचा आदर न करणाऱ्यांना जनता कदापि माफ करणार नाही. यंदाच्या निवडणुकीत स्वबळावर लढण्याची चांगली संधी भाजपकडे होती; परंतु राज्यातील राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन युती करावी लागली. गरज संपली की काही जण सोडून जातात, त्यामुळे दगाफटकाही झाला. आता युती नको, ही कार्यकर्त्यांची भावना ठीक आहे. यामध्ये बदल होईल किंवा नाही हे सांगता येत नाही; परंतु 2024 साठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे.’

शिवसेना आणि भाजपाने युती करून एकत्र निवडणूक लढवली होती. मात्र मुख्यमंत्रीपदावरुन मतभेद झाल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत मिळून सरकार बनवण्याचा निर्णय घेतला. कोणताही पक्ष बहुमत सिद्ध करू न शकल्याने 12 नोव्हेंबरपासून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू आहे. महाराष्ट्रात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी म्हणून महाशिवआघाडीचे सरकार बनवण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like