शिर्डी विमानतळावर अलायन्स एअरचे विमान घसरले

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाईन

मुंबईहून शिर्डीला आलेले अलायन्स एअरचे विमान लॅंडिंग करतना घसरले. ही घटना सोमवारी (दि.२१) सहाच्या सुमारास घडली. यावेळी विमानात ७० प्रवासी प्रवास करत होते. विमानातील सर्व प्रवसी सुखरुप असल्याचे सुत्रांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार मुंबई- शिर्डी विमान  5.29 मिनिटांनी शिर्डी विमानतळावर उतरणार होते पण रनवेच्या 50 मीटर अलीकडेच उतरल्याने हा अपघात झाला.