शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

माळशिरस : पोलीसनामा ऑनलाईन

गणेश उत्सवातील अनावश्यक खर्चाला फाटा देत शिवछत्रपती गणेश मंडळाने सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत कोंडबावी पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’cdc45d84-c0d7-11e8-bee4-21691d4698de’]

त्यांच्या या उपक्रमाचे समाजातील सर्व स्तरातून कौतूक होत आहे. कदमवस्तीतील युवा उद्योजक गणेश पाटोळे, मंडळाचे अध्यक्ष,गावचे सरपंच बाबूराव कदम,उपसरपंच विष्णू घाडगे, यांच्या हस्ते या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

सर्जिकल स्ट्राइकचे हिरो संदीप सिंग यांना वीरमरण 

यावेळी कोंडबावी शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मिंलीद रेडेकर, मंडळाचे उपाध्यक्ष रणजीत घाडगे, उमेश कदम, सुनिल भगत, आजिनाथ कदम, रामभाऊ माने, बापूराव कदम, निलेश पाटोळे, सागर घाडगे, कृष्णराज कदम, अभिजीत घाडगे तसेच कोंडबावी शाळेच्या मुख्याध्यापीका मीना पाटील मोहन बाबर, शितल बिराजदार, खोडे मँडम,अनुप जाधवर व दोडके आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन एल.टी.वाघ यांनी केले तर आभार कदमवस्तीचे अनुप जाधवर सर यांनी मानले.

[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’dfb56a4b-c0d7-11e8-b3d9-9d039f545c29′]