तब्बल ११०० पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना जेवण आणि पाण्याच्या बाटलीचे वाटप

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन 

गणपती विसर्जनाच्या रात्री तब्बल ११०० पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना जेवणाचे आणि पानी बाटलीचे वाटप करण्यात आले. इतकेच नव्हे तर स्वारगेट परिसरात एक निशुल्क रुग्णवाहिकाही ठेवण्यात आली होती.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’43d1ba67-bfee-11e8-a7aa-516d31dae641′]

याबाबत अधिक माहिती अशी की, जन हितम् संघटना आणि आखिल बिबवेवाडी वारकरी सेवा संघा तर्फे गणपती विसर्जनाच्या रात्री तब्बल ११०० पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या जेवणाचे आयोजन करण्यात आले होते, याचबरोबर स्वारगेट परिसरात एक निशुल्क रुग्णवाहिका देखील ठेवण्यात आली होती. याच बरोबर मिरवणुकीच्या विविध १८ मार्गांवर चहा बिस्कीट आणि पाणी याचे आयोजन करण्यात आले होते.

विशेष म्हणजे, माणूस उभा आहे वर्दीतला म्हणून सण साजरा होतो गर्दीतला, तसेच जे सातत्याने आपल्यासाठी, समाजासाठी , महिलांसाठी रस्त्यावर उभे राहून डोळ्यात तेल घालून सौरक्षण करतात, तेंव्हा कुठे आपण आपले सण साजरे करतो असे विचार मनात बाळगून आम्ही ही संकल्पना राबवली असे आयोजकांनी  म्हंटले आहे.

पुण्यात गणेश मुर्तीची विटंबना करणार्‍या नगरसेवकाला कार्यकर्त्यांसह अटक

यावेळी वाहतुक शाखेचे उपायुक्त तेजस्वि सातपुते, उपायुक्त बच्चन सिंग, सहाय्यक आयुक्त नागनाथ वाकुडे, सहाय्यक उपायुक्त प्रभाकर ढमाले,  पोलीस निरीक्षक कदम, पंडित, नलावडे, तसेच स्वारगेट, खडक, बिबवेवाडी, भारती विध्यापीठ, सहकार नगर, वहातूक शाखेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते,

तसेच जन हितम् संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रामविलास माहेश्वरी, ऋषिकेश शहा, निमा ताई गांधी, बोराजी, बद्रीजी झंवर, कुलकर्णी, तसेच रुग्णवाहिकेचे मुश्ताक, ओमप्रकाश महाराज व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच पासलकर यांच्या तर्फे वाहतूक जागृती करणारे पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले होते.

[amazon_link asins=’B07D9G1GHB,B07417987C,B0785JJF7L’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a95e2b98-bfef-11e8-84f8-1b4e36241362′]