42 व्या वर्षी ‘या’ भारतीय ऑल राऊंडरनं घेतली निवृत्‍ती, गांगुलीच्या कप्‍तानीमध्ये खेळलं होते ‘वर्ल्ड कप’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  माजी भारतीय क्रिकेटर दिनेश मोंगिया याने 42 वर्षीच्या वयात क्रिकेटमधून पूर्णता: संन्यास घेतला आहे. 2003 पासून सौरभ गांगुलीच्या कर्णधारपदाच्या नेतृत्वात वर्ल्डकप फायनल खेळणाऱ्या मोंगिया यांनी मंगळवारी आपण संन्यास घेत असल्याची घोषणा केली.

मोंगिया 2007 मध्ये शेवटी क्रिकेटच्या मैदानात पंजाब विरोधात खेळी केली होती परंतू IPL मध्ये खेळण्यावर बीसीसीआयने त्याच्यावर निर्बंध आणले होते. 
 

1995 – 96 मध्ये पंजाबमधून खेळण्यास सुरुवात करणाऱ्या मोंगियाने 2002 साली गुवाहटीमध्ये जिम्बाब्वेच्या विरोधात 159 धावाची खेळी करुन भारतीय संघात आपले स्थान निश्चित केले होते.

परंतू वर्ल्डकप नंतर तो काही खास प्रदर्शन करु न शकल्याने आणि बोर्डच्या असलेल्या निर्बंधामुळे तो क्रिकेट पासून दूर झाला, मोंगियाने आपल्या करिअरमध्ये 57 वन डे आणि एक टी – 20 मॅच खेळल्या. त्यात त्याने 1268 धावा जमावल्या.  

 

Visit : Policenama.com