अफगाणिस्तानात 6500 पाकिस्तानी दहशतवादी, UN च्या अहवालात खुलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानमधील दहशतवाद्यांबाबत संयुक्त राष्ट्र संघाच्या एका अहवालात खळबळजनक खुलासा झाला आहे. यूएनच्या अहवालानुसार अफगाणिस्तानात सुमारे 6,000-6,500 पाकिस्तानी दहशतवादी उपस्थित आहेत. या दहशतवाद्यांपैकी बरेच दहशतवादी तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तानच्या सोबत आहेत, ज्यामूळे दोन्ही देशांना धोका आहे.

भारतीय उपखंडात दहशतवादाशी संबंधित पाळत ठेवलेल्या पथकाच्या 26 व्या अहवालात म्हटले आहे की, इसिस, अल कायदाशी संबंधित दहशतवादी गट अल कायदा निम्रूज़ , हेलमंद आणि कंधार प्रांतांमध्ये तालिबानच्या अंतर्गत कार्यरत आहे. अहवालानुसार या धोकादायक दहशतवादी संघटनेत बांगलादेश, भारत, म्यानमार आणि पाकिस्तानचे 150 ते 200 सदस्य आहेत. एक्यूआयएसचे सध्याचे नेतृत्व असीम ओमरच्या जागी ओसामा महमूदच्या ताब्यात आहे. माहितीनुसार एक्यूआयएस त्याच्या माजी नेत्याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी या भागात सूड उगवण्याची योजना आखत आहे.

अहवालात असेही म्हटले आहे की अफगाणिस्तानात अनेक इतर दहशतवादी गट कार्यरत आहेत. बहुतेक लोक तालिबानच्या छत्र छायाखाली काम करतात, परंतु काही जण आयएसआयएलशी युतीमध्ये कार्यरत आहेत. अल-कायदा अफगाणिस्तानच्या 12 प्रांतांमध्ये (राज्ये) छुप्या पद्धतीने कार्यरत आहे आणि त्याचा नेता आयमान अल-ज़वाहिरी आहे. अफगाणिस्तानात अल-कायदामध्ये असलेल्यांची संख्या 400 ते 600 दरम्यान असल्याचा अंदाज पाळत ठेवणार्‍या पथकाने केला आहे. माहितीनुसार या दहशतवादी संघटना हक्कानी नेटवर्कशी जवळचा संपर्क राखतात. फेब्रुवारी 2020 मध्ये अल-जवाहिरीने विद्यमान सहकार्याबद्दल चर्चा करण्यासाठी हक्कानी नेटवर्क संपर्क कायम ठेवण्यासाठी याह्या हक्कानी बरोबर भेट घेतली.