Aloe Vera For Weight Loss | ‘या’ 5 पद्धतीने केले एलोवेराचे सेवन तर ताबडतोब कमी होईल वजन

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Aloe Vera For Weight Loss | कोरफड ही अशी एक वनस्पती आहे जी विविध कारणांसाठी मोठ्या प्रमाणात वापरली जाते. एक बहुपयोगी वनस्पती असल्याने, कोरफडीचे त्वचा, शरीर आणि एकूण आरोग्यासाठी अनेक उपयोग आणि फायदे आहेत. कोरफड जेल हे एक चांगले मॉयश्चरायझिंग एजंट आहे, म्हणून ते सौंदर्य उत्पादनांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. यात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा गुणधर्म असल्याने हे हेल्थ ड्रिंकमध्ये देखील वापरले जाते. (Aloe Vera For Weight Loss)

 

हे डेंटल प्लाक कमी करण्यासाठी आणि बद्धकोष्ठता इत्यादींसारख्या गॅस्ट्रिक विकारांमध्ये देखील उपयुक्त असल्याचे आढळले आहे. या व्यतिरिक्त कोरफड कापणे, जखम, भाजणे आणि हिरड्या आणि डोळ्यांच्या संसर्गामध्ये आराम देण्यासाठी देखील ओळखले जाते.

 

तसेच कोरफडीचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. त्यामुळे वजन कमी करायचे असेल तर कोरफडीचे सेवन या 5 प्रकारे करू शकता. (Aloe Vera For Weight Loss)

 

1. भाज्यांच्या ज्यूसमध्ये मिसळा
भाजीच्या ज्यूसमध्ये कोरफड मिसळून प्यायल्यास तिखट चव जाणवणार नाही. कोरफडीच्या रसाची चव चांगली नसते, त्यामुळे ते पिणे सोपे नसते.

2. खाण्यापूर्वी सेवन करा
जेवणापूर्वी कोरफडीचा ज्यूस प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. जेवणापूर्वी एक चमचा कोरफड खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. तसेच, ते चयापचय वाढते, ज्यामुळे शरीरातील फॅट बर्न होते.

 

3. गरम पाण्यासोबत घ्या
फॅट बर्नसाठी आणि वजन कमी करण्यासाठी कोमट पाणी सर्वोत्तम मानले जाते.
दररोज रिकाम्या पोटी एक किंवा दोन ग्लास कोमट पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
तसेच कोमट पाण्यासोबत कोरफडीचे सेवन केल्यास तुमचे वजन झपाट्याने कमी होईल.

 

4. लिंबू रससोबत
वजन कमी करण्यासाठी लिंबाचा रस देखील खूप प्रभावी आहे. लिंबूपाणीमध्ये कोरफडीचा रस मिसळल्याने तुमचे वजन लवकर कमी होऊ शकते.

 

5. मधात मिसळा
कोरफडीच्या ज्यूसमध्ये तुम्ही मधाचे काही थेंब टाकू शकता, ज्यामुळे त्याची चव सुधारेल. मध या पेयात गोडवा आणते.
याव्यतिरिक्त, मध देखील अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीफंगल घटकांचा समृद्ध स्त्रोत आहे, जे संक्रमणाशी लढण्यास मदत करते.

 

(Disclaimer :- वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :-  Aloe Vera For Weight Loss | 5 ways to consume aloe vera for weight loss
Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

TET Exam Scam | पुणे सायबर पोलिसांकडून IAS अधिकारी सुशील खोडवेकरला अटक; शिक्षक भरती घोटाळ्यातील सहभाग समोर आल्यानं कारवाई

 

Ajit Pawar | पुण्यातील शाळा-महाविद्यालयांबाबत अजित पवारांची महत्वाची माहिती; म्हणाले…

 

Sitaram Kunte | ईडी चौकशीदरम्यान माजी मुख्य सचिव सीताराम कुंटेंचा अनिल देशमुखांवर गंभीर आरोप, म्हणाले -‘अनिल देशमुख पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीची…’