‘तो मी नव्हेच’ संस्कारी बाबुजी आलोकनाथ यांचा पवित्रा

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन

स्थिकर्स विन्टा नंदा हिच्यावर बलात्कार झाला असेल पण मी तो केलेला नाही’ या शब्दात आलोकनाथ यांनी लेखिका दिग्दर्शिका विन्टा नंदा हिच्या आरोपांवर पांघरून घातले आहे. सोमवारी रात्री विन्टा नंदा यांनी फेसबुकच्या माध्यमातून आलोकनाथ यांच्यावर बलात्कार आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला होता.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e0344867-cbb2-11e8-a869-8d6e0acf6426′]

२० वर्षांपूर्वी मुख्य अभिनेत्रीची छेड काढली म्हणून आलोकनाथ यांना ‘तारा’ या मालिकेतून विन्टा नंदा यांनी हाकललं होतं. त्यानंतर एक दिवशी विन्टा नंदा यांच्यावरती आलोकनाथ यांनी बलात्कार केला व पुढे काही वर्षं मानसिक छळही केल्याचा आरोप नंदा यांनी केला आहे. याबद्दल एका वृत्तवाहिनीने आलोक नाथ यांना विचारलं असता ते म्हणाले,’ बलात्कार झाला असेल,मी हे नाकारत नाही. पण तो बलात्कार मी केलेला नाही. हे प्रकरण आता बाहेर आलं असून बरेच दिवस गाजणार आहे. तसंच सध्या फक्त महिलांचीच बाजू ऐकली जाते आहे. पुरूषांची बाजू कोणीच ऐकत नाही. त्यामुळे मी यावर जास्त काहीच बोलणार नाही. ‘

दरम्यान विन्टा नंदा आणि ताराची मुख्य अभिनेत्री नवनीत निशाण यांच्या विधानांच्या आधारे आलोकनाथ यांना नोटीस पाठवण्याची तयारी सिंटाने केली आहे. सर्वच क्षेत्रातून विन्टा नंदा यांना सहानुभूती आणि पाठिंबा मिळतो आहे या संपूर्ण प्रकरणाची ‘सिने अॅण्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन’ने (CINTAA) दखल घेतली असून आलोक नाथ यांच्याविरोधात कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे.

[amazon_link asins=’B073JWXGNT,B07CXXBTST’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’efc962ea-cbb2-11e8-a64d-a9b60297457e’]