#Metoo : ‘ते’ दारू प्यायल्यावर मात्र राक्षसासारखे वागतात…

0
82
लैंगिक छळ
File Photo

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

# मी टू या मोहिमेअंतर्गत संस्कारी बाबूजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेते आलोक नाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. आलोक नाथ यांच्यासोबाबत काम केलेल्या जेष्ठ अभिनेत्री हिमानी शिवपुरी यांनी देखील आलोक नाथ यांच्याबददलची काही खुलासे केले आहेत.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ea12b3f3-ce06-11e8-be3e-9f68fae6da65′]

आलोक नाथ यांची मुलींशी गैतवर्तणूक करणं हे सिनेविश्वात एक उघड गुपित असल्याचा खुलासा ज्येष्ठ अभिनेत्री हिमानी शिवपुरी यांनी केला आहे. आलोकनाथ यांच्या गैरवर्तणूकीबद्दल वाच्यता करणं लोकं कायम टाळत आले आहेत असंही शिवपुरी यांनी सांगितलं.

हिमानी शिवपुरी यांनी अनेक चित्रपटांमध्ये आलोकनाथ यांच्यासोबत काम केलं आहे. पण शिवपुरी यांना मात्र आलोक नाथचा असा काही अनुभव आला नसल्याचंही त्यांनी सांगितलं.’ माझ्याशी आलोक नाथ यांचं वागणं कायमच चांगलं होतं. पण माझ्या मैत्रिणींना मात्र खूप वाईट अनुभव आले आहेत. त्यांच्या पत्नीलाही या विषयी कल्पना होती’.
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f6617dba-ce06-11e8-ad77-79cf9e3b4874′]

मद्यपान केल्यावर आलोक नाथ यांचा स्वत:वरचा ताबा सुटतो. एरवी अत्यंत चांगली वागणूक असणारे आलोक नाथ दारू प्यायल्यावर मात्र एका राक्षसासारखे वागतात. त्यांच्या गैरवर्तणूकीसाठी त्यांना एकदा विमानातूनही हकललं गेलं होतं अशी माहितीही त्यांनी दिली. ‘९० च्या दशकात त्यांनी अनेक कलाकारांसोबत असं केलं होतं. पण तेव्हा याविषयी लोकं बोलणं टाळत असतं. अगदी विन्टाला ही बोलायला २० वर्षं लागले’ असंही शिवपुरी म्हणाल्या.
[amazon_link asins=’B07CK51LT9′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’771f413b-ce07-11e8-ab58-23239810fc01′]

‘मलाही असे अनुभव आले आहेत’

आपल्या सिनेसृष्टीतील प्रवासाबद्दल बोलत असताना मलाही अशा गोष्टींचे अनुभव आल्याचं शिवपुरी यांनी सांगितलं. अनेक अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी शिवपुरी यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता. पण शिवपुरींनी मात्र त्यांना तिथल्या तिथे झिडकारले होते.

राष्ट्रवादीच्या बैठकीपूर्वी जितेंद्र आव्हाड ‘मातोश्री’वर !