एकनाथ खडसेंसोबत कन्या रोहिणीही राष्ट्रवादीत जाणार, पण सूनबाई…

मुंबईः पोलीसनामा ऑनलाईन – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath khadse) यांनी अखेर पक्षाला सोड चिठ्ठी दिली आहे. खडसे हे शुक्रवारी (दि. 23) दुपारी दोन वाजता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( NCP chief Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत करणार आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) यांनी खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत अधिकृतरित्या घोषणा केली. खडसे यांच्यासोबत त्यांची कन्या रोहिणी खडसे ( khadse-daughter-rohini Khadse will-also-join-ncp ) या देखील त्यांच्यासोबत राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. .

खडसे यांच्या प्रवेशाबद्दल पाटील म्हणाले की, गेली तीन, साडेतीन दशके भाजपात असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे भाजपला सोडचिठ्ठी दिल्याचे मला कळवले आहे. ते शुक्रवारी (दि. 23) राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. तसेच खडसे यांना मानणारे, त्यांचे समर्थक, कार्यकर्ते यावेळी प्रवेश करणार असल्याचे पाटील म्हणाले. दरम्यान भाजपा खासदार आणि खडसे यांच्या सून खासदार रक्षा खडसे भाजपा सोडणार नाहीत, अशी माहिती स्वतः खडसे यांनी राजीनाम्यानंतर दिली आहे. धुळ्याचे माजी आमदार शरद पाटीलही खडसे यांच्यासोबत राष्ट्रवादीत जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच भुसावळचे आमदार संजय सावकारे हे खडसे समर्थक असले तरी ते देखील सध्या भाजपातच राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

खडसे यांची राजकीय कारकिर्द
खडसे हे गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक मानले जातात. परंतू मुंडे यांच्या निधनानंतर खडसे यांना प्रदेश भाजपमध्ये डावलण्यात आल्याचा आरोप त्यांचे समर्थक करत आहेत. खडसे हे राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद भूषवल आहे. तसेच फडणवीस सरकारमध्ये ते महसूलमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.

विरोधी पक्षनेते म्हणून दमदार कामगिरी
खडसे यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून दमदार कामगिरी केली आहे. अभ्यासू आणि लोकांच्या प्रश्नावर त्यांनी अनेकवेळा विधानसभेत सरकारला धारेवर धरले आहे. आकडेवारी आणि पुराव्यासह ते सरकारच्या मंत्र्यावर तुटून पडत असत. एकेकाळी नागपूर अधिवेशनात व्हॅट प्रश्नावर चर्चा करताना खडसे यांनी सलग आठ तास भाषण करून विक्रम नोंदविला. या भाषणामुळे तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखऱ यांनी खडसे यांचा विशेष सन्मान केला होता.