Obesity आणि डायबिटीजसह गोड पदार्थांचे सेवन खराब करू शकते तुमची इम्यून सिस्टम सुद्धा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोविड-19 ची प्रकरणे वाढत असल्याने लोक पुन्हा एकदा फिट राहणे आणि इम्यूनिटी वाढवण्यावर जोर देत आहेत. आतापर्यंत असे मानले जात होते की, गोड पदार्थ खाण्याने केवळ ओबेसिटी आणि डायबिटीजची समस्या होते, परंतु अलिकडेच झालेल्या संशोधनानुसार हे इम्युनिटीसाठी सुद्धा तेवढेच नुकसानकारक आहे.

लंडन येथील युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टल आणि फ्रान्सिस क्रिक इन्स्टीट्यूटच्या संशोधकांनी लावलेला शोध नेचर कम्युनिकेशन नावाच्या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे. सामान्यपणे गोड पेय पदार्थ, मिठाई आणि प्रोसेस्ड फूडमध्ये फ्रक्टोज आढळतात. जर शरीरात याची लेव्हल वाढली तर यामुळे इम्यून-सिस्टमशी संबंधी अवयवय जसे की थायरॉईड ग्लँड आणि लिंफनोड्स इत्यादीमध्ये सूज येते आणि याच्यामुळे जास्त मात्रेत रिअ‍ॅक्टिव्ह मॉलीक्यूल निर्माण होतात. सूजमुळे सेल्स आणि टिश्यूजसह अनेक महत्वाच्या अवयवांची कार्यक्षमता सुद्धा कमी होऊ लागते. यासाठी जर तुम्हाला नेहमी सक्रिय आणि निरोगी रहायचे असेल तर गोड पदार्थांपासून दूर राहा.

डॉक्टरांचा सल्ला
हे संशोधन काही मर्यादेपर्यंत खरे आहे. जास्त गोड पदार्थ खाणार्‍यांची रोगप्रतिकारशक्ती कमजोर होऊ शकते. याचा कारणामुळे चांगल्या आरोग्यासाठी लोकांना गोड पदार्थांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो.