पक्षाने स्वागत केले मीही करणे क्रमप्राप्त : खा. दिलीप गांधी

अहमदनगर: पोलिसनामा ऑनलाईन – पक्षाच्या नेत्यांनी डॉ. सुजय विखे यांचे स्वागत केले आहे. त्यामुळे मीही त्यांचे स्वागत करणे क्रमप्राप्त आहे, असे खा. दिलीप गांधी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

विखे यांच्या भाजप प्रवेश याबाबत बोलताना खा. गांधी म्हणाले की, मी जनसंघाचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे पूर्वीपासून भाजपचा कार्यकर्ता आहे. यापुढेही राहणार आहे. वारिष्ठांनी जो निर्णय घेतला, तो मान्य आहे. लोकसभा निवडणुकीबाबत माझी पुढची भूमिका योग्य वेळी जाहीर करील. आत्ताच जाहीरपणे बोलणार नाही.

डॉ. सुजय विखे यांचे नाव लोकसभा उमेदवारीसाठी पाठविण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील उल्लेखाबाबत त्यांना विचारले असता, ‘हा त्यांचा निर्णय आहे. आत्ताच न बोलता योग्य वेळी बोलणार आहे’, असे सांगितले आहे.

ह्याहि बातम्या वाचा

… त्यामुळेच पवारांची निवडणुकीतून माघार : चंद्राकांत पाटील

आयुष्यमान खुराणाने ‘या’ चित्रपटाची कथा चोरली ?

पार्थ पवारांच्या उमेदवारीने श्रीरंग बारणे अडचणीत

आता नगर भाजपचा बालेकिल्ला झाला ; मुख्यमंत्र्यांचा दावा

दोन सख्ख्या भावांमध्ये मुलीवरून मारहाण