स्टोरी आणि कॅरेक्टर्ससोबतच ‘पाताल लोक’मध्ये आणखीही बरंच काही ‘खास’ आहे ! 110 लोकेशन्सवर झालीय शुटींग

पोलिसनामा ऑनलाइन –अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओनं ओरिजनल सीरिज पाताल लोकचा टीजर काही दिवसांपूर्वीच रिलीज केला होता. यानंतर आता या सीरिजचा ट्रेलर लाँच करण्यात आला. 9 एपिसोड असणारी ही सीरिज 15 मे रोजी लाँच होणार आहे. अ‍ॅमेझॉनच्या अधिकृत युट्युब चॅनलवरून हा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. अनुष्का शर्माच्या बॅनरखाली तयार करण्यात आलेल्या या सीरिजमध्ये सस्पेंस, थ्रिल भरपूर आहे. चाहत्यांना आता याच्या रिलीजची प्रतिक्षा आहे.

यातील क्राईमपेक्षाही ही सीरिज बनवण्याची कहाणी खूप रोचक आहे. असं सांगितलं जात आहे की, ही सीरिज 1 किंवा 2 नाही तर 10 नाही तर जवळपास 110 लोकेशन्सवर शुट करण्यात आली आहे. दिल्ली, रोहतक, गुरुग्राम, मुंबई या लोकेशन्ससोबतच पाताल लोकची शुटींग चित्रकूट आणि अहमदाबाद अशी ठिकाणी देखील करण्यात आली आहे. याला रिअल आणि इंटेंस बनवण्यासाठी कोणतीही कसर करण्यात आलेली नाही.

कास्टींग

निर्माता सुदीप शर्माची वेब सीरिज पाताल लोक 15 मे 2020 रोजी अॅमेझॉन प्राईम व्हिडीओजवर रिलीज होणार नाही. सुदीप शर्मानं याआधी उडता पंजाब आणि एनएच 10 असे सिनेमे लिहले आहेत. याचे दोन डायरेक्टर आहेत. एक आहे अविनाश अरूण आणि प्रोसित रॉय. दृश्यम हा सिनेमा अविनाशनं डायरेक्ट केला आहे तर परी हा सिनेमा प्रोसितनं डायरेक्ट केला आहे. जयदीप अहलावतनं हाथीरामची भूमिका साकारली आहे तर नीरज कबी संजीव मेहाराची भूमिका साकारली आहे. गुल पनाग, जगदीत संधु, विपीन शर्मा, अभिषेक बॅनर्जी हे देखील यात काम करताना दिसणार आहेत. ही सीरिज अनुष्का शर्माच्या क्लीन स्लेट फिल्म्स या प्रॉडक्शन हाऊसअंतर्गत तयार करण्यात आली आहे.