Coronavirus : कोरोना होऊन गेला असेल तरी पुन्हा होऊ शकतो; डॉक्टरांनी सांगितलं ‘हे’ कारण

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही कोरोनाची लाट दिसू लागली आहे. तर या विषाणूमध्ये एक जनुकीय बदल होत असल्याचे दिसत आहे. कोरोना विषाणूच्या स्पाईक प्रोटीनमध्ये बदल झाल्यामुळे व्यक्तीला याआधी कोरोना संसर्ग झाला असेल तर त्याला दुसऱ्या लाटेत कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो, म्हणून, कोणीही निष्काळजी राहू नये नियम सर्वांनी पाळावेत, अशी माहिती एका शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञांकडून देण्यात आली आहे.

कोरोनाने दुसऱ्या वर्षीही कहर केला आहे. यामध्ये अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. जिल्ह्यातील कोरोनाचा हा नवा स्ट्रेन आहे का? याच्या तपासणीसाठी पुणे NIV कडे ३० नमुने पाठविले गेले आहे. परंतु, त्यांचा अहवाल अजूनही आलेला नाही. ह्या अगोदर कोरोना झालेल्या अनेक व्यक्ती आपल्याला कोरोना होणार नाही या संभ्रमात राहून नियमाचे पालन करत नसल्याचे पुढं आले आहे. तर या लोकांनी पूर्णपणे काळजी घेणे महत्त्वाचे आहे. असे डॉक्टरांनी सांगितले आहे. तसेच, दुसरी लाट आणि त्याचे परिणाम कमी करायचे असल्यास व्यवस्थित मास्क परिधान करणे, हात स्वच्छ ठेवणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे या गोष्टीचे नियम पाळले पाहिजेत, तरच याचा धोका रोखता येणार आहे, असे औषध वैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. भाऊराव नाखले यांनी म्हटले आहे

या दरम्यान, मानवाच्या शरीरात विषाणू गेल्यास विषाणूच्या रचनेत वारंवार बदल होत असते. या प्रक्रियेला जनुकीय बदल’ (Mutation) असे म्हणतात. जेव्हा २ जनुकीय बदल झालेले विषाणू एकत्र येऊन मूळ विषाणूच्या संपर्कात येतात तेव्हा मूळ विषाणूमध्ये अनेक बदल होतात. यालाच ‘डबल म्युटेशन’ (Double mutation) म्हटले जाते. यंदाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाचे हे असे डबल म्युटेशन असू शकते. याकरणाने गंभीर परिणाम दिसू शकतात.तसेच यामध्ये लसीकरण झालेले आणि याआधी कोरोना झालेल्यांनाही पुन्हा कोरोना होऊ शकतो, परंतु परिणाम घातक नसतात. असेही डॉ. भाऊराव नाखले यांनी सांगितले आहे.