Bigg Boss : अली गोनीची कविताला धमकी; म्हणाला ‘तुला सुखानं जगू देणार नाही !’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बिग बॉस 14 (Bigg Boss Hindi season 14) च्या घरात अनेक ट्विस्ट अँड टर्न्स येताना दिसत आहेत. अलीकडेच कुमार सानू (Kumar Sanu) यांचा मुलगा जान कुमार सानू (Jaan Kumar Sanu) हा घरातून एलिमिनेट झाला. याशिवाय कविता कौशिक (Kavita Kaushik) आणि अली गोनी (Aly Goni) यांच्यातही जोरदार भांडण सुरू आहे. तुला सुखानं जगू देणार नाही, असं म्हणत अलीनं कविताला थेट धमकीच दिली.

कविता सध्या बिग बॉसच्या घरातील कॅप्टन आहे. घरातील प्रत्येक सदस्याला कविताचे म्हणजेच कॅप्टनचे आदेश मानावे लागतात. परंतु अली मात्र कविताचे आदेश मानण्यास नकार देत आहे. कविता घरातील सर्व सदस्यांना कामं वाटून देत आहे. अशात अलीनं मात्र कवितानं सांगितलेलं काम करण्यास नकार दिला. यामुळं दोघांमध्ये जोरदार भांडण झालं. यादरम्यान अलीनं कविताला धमकीच दिली. या घरात तुला सुखानं जगू देणार नाही असं तो म्हणाला.

अली आणि कविता यांच्या भांडणाचा एक व्हिडिओदेखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. काही तासांतच हजारो नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. काहींनी तर कविताला पाठिंबाही दिला आहे. अनेक चाहत्यांनी आणि नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी अलीचं समर्थन केल्याचंही दिसत आहे.

You might also like