महेंद्र सिंह धोनीनं यष्टीरक्षक म्हणून नोंदवलेले सर्वात मोठं रेकॉर्ड मोडलं, ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ महिला क्रिकेटरनं रचला इतिहास

पोलिसनामा ऑनलाईन : ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाची कर्णधार एलिसा हिली ने आंतरराष्ट्रीय टी -२० मध्ये यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीला मागे टाकले आहे. टी -२० मध्ये जास्तीत जास्त बाद करण्याच्या बाबतीत हिलीने धोनीला मागे टाकले आहे आणि आता ती पुरुष व महिला दोन्ही क्रिकेटमधील सर्वाधिक बाद करणारी यष्टिरक्षक बनली आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसर्‍या टी -२० सामन्यात हिलीने हे साध्य केले. हिलच्या आता ९९ टी -२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ९२ गळी बाद केले आहेत. तो धोनीपेक्षा एक पाऊल पुढे आहे. धोनीने आतापर्यंत ९१ जणांना बाद केले आहे. हिली नंतर इंग्लंडच्या ३९ वर्षीय सारा टेलरने ७४ जणांना बाद केले आहे. राहेल प्रिस्टने ७२ तर मारिसा अगुइलीयाचे ७० ने जणांना बाद केले आहे.

त्याच्यापाठोपाठ दिनेश रामदिनचा समावेश आहे ज्याने ६३ जणांना बाद केले. रामदिननंतर मुशफिकुर रहीम रहीमने ६१ जणांना बाद केले आहे. दुसरीकडे, जर सर्व ठिकाणी पाहिले तर दक्षिण आफ्रिकेचा मार्क बाऊचर आघाडीवर आहे. बाऊचरने ४६७ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ९९८ जणांना बाद केले आहे.

त्याच्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियाचा अ‍ॅडम गिलक्रिस्ट आहे.ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या नावे ३९६ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ९०५ जणांना बाद केले आहे. धोनी तिसर्‍या क्रमांकावर आहे. ५३८ सामन्यात धोनीने ८२९ जणांना बाद केले आहे. गेल्या महिन्यात धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like