आमलकी एकादशी ! महत्व, व्रत अन् पूजाविधी

पोलीसनामा ऑनलाईन टीम – फाल्गुन पौर्णिमा म्हणजेच होळीपूर्वी ही एकादशी येत असल्यामुळे याला रंगभरनी एकादशी असेही म्हणतात. फाल्गुन शुद्ध येणाऱ्या एकादशीला आमलकी एकादशी असे म्हटले जाते. या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते. पौराणिक मान्यतेनुसार आमलकी एकादशीला भगवान विष्णूची पूजा केल्याने लाभ होतो अशी मान्यता आहे.

आवळ्याच्या झाडाचे पूजन

या दिवशी आवळ्याच्या झाडाचे पूजन केले जाते. आवळ्याच्या झाडाजवळचा परिसर स्वच्छ करून घ्यावा. या झाडाखाली कलशाची स्थापना करावी. भगवान विष्णूचे नामस्मरण करून पूजन करावे. कलशाला धूप, दीप आणि नैवेद्य दाखवावा. तसेच आवळ्याचे सेवन करावे. या वातावरणीय बदलाची आपल्या शरीराला सवय व्हावी, यासाठी आपल्याकडील व्रत, परंपरा, पूजन महत्त्वाचे आहेत. आवळा हा विष्णूला अत्यंत प्रिय असल्याचे मानले जाते. पचनक्रिया, वजन कमी करणे, हाडे मजबूत करणे, डोळ्यांसाठी गुणकारी, संसर्गापासून संरक्षण करणे, असे आवळ्याचे अनेक उपयोग देखील आहेत.

आमलकी एकादशीचे व्रत
आमलकी एकादशीदिवशी सकाळी उठून व्रताचा संकल्प करावा. श्री विष्णूची मूर्ती किंवा प्रतिमा एका चौरंगावर स्थापित करावी. हे व्रत करणाऱ्यांनी विष्णू सहस्रनाम म्हणावे, नैवेद्य दाखवावा. हे व्रत एकादशीच्या दिवशी समाप्त न होता. द्वादशीला यथाशक्ती अन्नदान करून व्रताची समाप्ती करावी.

You might also like