पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Amar Mulchandani ED Raid | पिंपरी चिंचवडमधील सेवा विकास बँकेचे (Seva Vikas Co-Operative Bank) माजी चेअरमन अॅड. अमर मूलचंदानी (Former Chairman Adv. Amar Mulchandani) यांच्या घरावर सक्तवसुली संचालनालयाने Directorate of Enforcement (ईडी- ED) छापा मारल्यानंतर मूलचंदानी यांनी घरातच महत्त्वाचे पुरावे नष्ट केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अमर मूलचंदानी, त्यांचा भाऊ व माजी सहायक सरकारी वकील अशोक साधुराम मूलचंदानी (Former Assistant Public Prosecutor Ashok Sadhuram Mulchandani) याच्यासह सहा जणांवर पिंपरी पोलीस ठाण्यात आयपीसी 120(ब), 201, 353 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Amar Mulchandani ED Raid)
याप्रकरणी ईडीचे सहायक संचालक सुधांशू श्रीवास्तव (ED Assistant Director Sudhanshu Srivastava) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) ईडीच्यावतीने स्वतंत्र तक्रार दिली आहे. पोलिसांनी अमर साधुराम मुलचंदानी, अशोक साधुराम मुलचंदानी, मनोहर साधुराम मुलचंदानी, दया अशोक मुलचंदानी, साधना मुलचंदानी, सागर मनोहर मुलचंदानी यांच्यावर पुरावा नष्ट करणे, कट रचणे आणि सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आदी कलमांतर्गत गुन्हा (FIR) दाखल केला आहे.
बँकेच्या कथित गैरव्यवहार आणि अनियमितता प्रकरणात मूलचंदानी यांच्यावर यापूर्वी 16 गुन्हे दाखल आहेत. तसेच कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आल्याने आरबीआयने (RBI) बँकेचा परवाना रद्द केला आहे. या विविध गुन्ह्यांमध्ये अमर मूलचंदानी नुकतेच जामिनावर (Bail) सुटले आहेत. दरम्यान, शुक्रवारी (दि.27) सकाळी ईडीने मूलचंदानी यांच्यासह सागर सूर्यवंशी (Sagar Suryavanshi) तसेच पुण्यातील एका शाळेच्या संस्थापक अध्यक्षाच्या घरावर छापा मारला होती. त्यावेळी मूलचंदानी याच्या घरच्यांनी आतून दार बंद केले होते. दोन-अडीच तास दार उघडले नाही.
ईडीने छापा टाकला (Amar Mulchandani ED Raid) त्यावेळी सुरक्षेसाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (Central Reserve Police Force) अधिकारी, कर्मचारी बरोबर होते. बराच वेळ दार उघडले नसल्याने ईडीने किल्ली बनवणाऱ्या व्यक्तीला बोलावून घेतले. त्यावेळी मूलचंदानी यांनी दार उघडले. मूलचंदानी राहत असलेल्या मिस्टी पॅलेस या इमारतीत ठिकठिकाणी आणि अंतर्गत भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत.
ईडीने छापा मारल्यानंतर सर्व सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेतले. मूलचंदानी याच्या घरात
प्रवेश केल्यावर त्याठिकाणी अमर मूलचंदानी सोडून कुटुंबतील सदस्य उपस्थित असल्याचे भासवण्यात आले होते.
तसेच हे कुटुंब ईडी अधिकाऱ्यांना चौकशी करताना खोटी माहिती सांगत होते.
घरात तपासणी करत असताना बंद खोल्या उघडण्यावरुन कुटुंबियांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना विरोध केला.
ईडीचे अधिकारी घरात आल्यानंतर अमर मूलचंदानी साडेआठ तास वरील मजल्यावरच्या खोलीत लपून बसले होते.
या ठिकाणी त्यांनी अनेक पुरावे नष्ट केल्याचे ईडी अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Web Title :- Amar Mulchandani ED Raid | ed raid in pimpri chinchwad amar moolchandani along with 4 persons detained
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Pune Crime News | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार, वैद्यकीय उपचाराच्या बहाण्याने 5 लाख उकळले; कोथरुड परिसरातील घटना
- Dhule Crime News | कौटुंबिक वादाला कंटाळून आरोपी पतीकडून पत्नीची भरदिवसा हत्या
- Pune Crime News | मध्य प्रदेशातून घेऊन आलेला चालक कीया सेल्टॉस गाडी घेऊन झाला पसार; निवृत्त उपसचिवाला चालकाने घातला गंडा