रावसाहेब दानवेंचा फोन आला अन् मी खासदार झालो : अमर साबळे

भोकरदन : पोलीसनामा ऑनलाइन – खासदार अमर साबळे यांनी आपण खासदार झाल्याचे सर्व श्रेय भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना दिलं आहे. आपण खासदार कसे झालो याबद्दल साबळे यांनी एक किस्सा सांगितला आहे. बौद्ध विहाराचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी साबळे बोलत होते.

मी एका गरीब कुटुंबातला मुलगा. गेल्या २५ वर्षांपासून भाजपचा कार्यकर्ता आहे. आजच्या काळात गावच्या ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, नगरसेवक, नगराध्यक्ष होणे किती अवघड आहे. पण रावसाहेब दानवे यांनी मला थेट राज्यसभेत खासदार केले. तेच माझे राजकीय गुरु आहेत, असं म्हणत साबळेंनी दानवेंच कौतुक केलं.

एके दिवशी रात्री जेवण करून मी माझ्या कुटुंबीयांसोबत बसलो होतो. तेव्हा खासदार रावसाहेब दानवे यांचा मला फोन आला. ते म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याकडे मी तुमच्या नावाची शिफारस केली असून उद्यापासून तुम्ही राज्यसभेचे खासदार होणार आहात, असे सांगितले. तो माझ्यासाठी सुखद धक्का होता, असं त्यांनी यावेळी सांगितलं.

बौद्ध विहाराचे दान हे सर्वश्रेष्ठ समजले जाते. रावसाहेब दानवे यांना मला गुरुदक्षिणा द्यायचीच होती. म्हणून माझ्या खासदार निधीतून 25 लाखाचा निधी मी बौद्ध विहारच्या कामासाठी दिला. ही संधी दानवे यांनी मला दिली हे त्यांचे माझ्यावर त्यांचे उपकार आहेत, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

दरम्यान, त्यावर मी साबळेंना म्हणालो की तुम्ही बुद्ध विहारासाठी पैसे दिले, ते खाल्ले का, कुठे टाकले ? काही बांधलं का ? एकदा बघायला तर या. पण साबळेना जमतच नव्हते. अखेर त्यांना आज सकाळी मी हेलिकॉप्टर मध्ये घेऊन आलो, असं दानवेंनी सांगितलं.