एकेकाळी जवळचे मित्र होते अमरसिंह आणि अमिताभ, मग अशा प्रकारे आला नात्यात दुरावा

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन –   समाजवादी पक्षाचे माजी नेते अमरसिंह यांचे शनिवारी दुपारी निधन झाले. ते बऱ्याच काळापासून आजारी होते, त्यांच्यावर सिंगापूरमधील रुग्णालयात उपचार सुरू होते. अमिताभ बच्चन आणि अमरसिंह यांच्या मैत्रीची एकेकाळी खूप चर्चा असायची. मात्र, नंतर काही कारणांमुळे या दोघांचे नात बरेच बिघडले. दरम्यान, 90 च्या दशकात जेव्हा अमिताभ बच्चन यांची कारकीर्द अत्यंत वाईट अवस्थेत होती. त्यांची एबीसीएल कंपनी दिवाळखोरी झाली आणि त्यानंतर अमरसिंग एक देवदूत म्हणून त्यांच्या आयुष्यात आले.

अमिताभबद्दल स्वत: अमरसिंह यांनी म्हटले की, जेव्हा मोठ्या कॉर्पोरेट संस्थांनीही अमिताभला मदत करण्यास नकार दिला तेव्हा त्यांनी अमिताभला बुडण्यापासून वाचवले. आता प्रश्न पडतो की एक दिग्गज नेते आणि राजकारणी यांची मैत्री कशी झाली? माहितीनुसार, सहारा समूहाचे मालक सुब्रत रॉय यांनी अमर सिंह आणि अमिताभ बच्चन यांची मैत्री करून दिली. असे म्हणता येईल की, अमिताभच्या श्रीमंतीने सहारा श्रीला मदत केली. मात्र, २०१० मध्ये समाजवादी पक्षाशी झालेल्या बंडखोरीत बच्चन कुटुंब अमरसिंह यांच्याबरोबर उभे न झाल्याने त्यांचे संबंध खराब होऊ लागले.

जया बच्चन देखील समाजवादी पार्टी सोडतील, अशी अमरला आशा होती, पण तसे झाले नाही आणि उलट जया यांनी अमर यांच्यावर निशाणा साधला. म्हणूनच, अमिताभ-जया यांनी अनेकदा या नंतर अमरवर निशाणा साधला. अमर सिंग यांनी जया बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या नात्याबद्दलच बच्चन कुटुंबीयांना लक्ष्य केले नाही तर त्यांनी एक विडिओ प्रसारित करून एकदा जया बच्चन यांना संसदेत दिलेल्या वक्तव्याबद्दल घेरले आणि बच्चन कुटुंबीयांनी बनवलेल्या चित्रपटांबद्दल त्यांना चांगलेच सुनावले. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अमर सिंह यांच्या किडनीचे प्रत्यारोपण झाल्याची माहिती आहे.