राज्यसभा खासदार आणि समाजवादी पार्टीचे माजी नेता अमर सिंह यांचं 64 व्या वर्षी सिंगापूरमध्ये प्रदीर्घ आजारानं निधन

वृत्तसंस्था – गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असलेले समाजवादी पार्टीचे माजी नेता अमर सिंह यांचं निधन झालं आहे. सिंगापूर येथील एका हॉस्पीटलमध्ये त्यांच्यावर उपचार चालू होते. दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. एकेकाळी उत्तर प्रदेशातील ते मोठे नेते होते.

समाजवादी पार्टीचे प्रमुख मुलायम सिंह यादव यांच्यासोबत त्यांचे अतिशय जवळचे संबंध होते मात्र नंतर त्यामध्ये त्यांच्यात दुरावा निर्माण झाला होता.

अमिताभ बच्चनसह इतर मोठया अभिनेत्यांबरोबर देखील त्यांचे अतिशय चांगले संबंध होते. अमर सिंह यांच्यामुळे समाजवादी पार्टीला मोठा फायदा झाला होता. दरम्यान, गेल्या काही दिवसांपुर्वी त्यांनी अमिताभ बच्चन यांची माफी मागितली होती. एक उद्योगपती म्हणून देखील अमर सिंह यांना ओळखले जात होते.