अमर सिंहांचा अखिलेश यांच्यावर ‘घणाघात’ ; यशासाठी दिला ‘हा’ मंत्र

लखनऊ : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मायावती यांच्या बहुजन समाजवादी पार्टी आणि अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टी यांनी आघाडी करत निवडणूक लढवली होती. मात्र लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर आज दिल्लीत पार पडलेल्या चिंतन बैठकीत मायावती यांनी महाआघाडीचा उत्तर प्रदेशात काही फायदा झाला नाही. यादवांचे मतदान बसपाला मिळाले नाही, असे सांगत उत्तर प्रदेशात ११ ठिकाणी होणाऱ्या विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली. त्यानंतर आता विविध राजकीय नेते यावर प्रतिक्रिया देताना दिसून येत आहे. भाजप नेत्या जयाप्रदा यांच्यानंतर आता एकेकाळी मुलायम सिंग यांच्या जवळचे असलेल्या अमर सिंह यांनी अखिलेश यादव यांना चिमटा काढला आहे.

अखिलेश यादव यांच्यावर टीका करताना ते म्हणाले कि, आंध्रप्रदेशात जगनमोहन रेड्डी यांच्याव्यतिरिक्त देशभरात सगळ्याच मोठ्या नेत्यांचे राजकीय वारस विफल ठरले आहेत. यासंबंधी अमर सिंह यांनी एक ट्विट केले आहे. ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे कि, इंजिनियरने नवीन प्रयोग करणे ठीक आहे, मात्र जर दरवेळी तो प्रयोग जर फसत असेल तर मग तो इंजिनियर काही कामाचा नाही, बेटा अखिलेश तू प्रत्येक वेळी कुणासाठी तरी संकर घेऊनच येत असतो. त्यांनी असे म्हणचे कारण असे आहे कि, याआधी देखील २०१७ मध्ये झालेल्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसबरोबर आघाडी केली होती.
दरम्यान, यावेळी त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर देखील टीका केली. यावेळी ते म्हणाले कि, मी बंगालमध्ये राहिलो आहे. बंगालमधील नागरिक फार सहनशील असतात.

आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि बौद्धिक प्रकारे देखील ते खुप हुशार असतात. ते फार लवकर आपला पराजय मान्य करत नाहीत. यावेळी ममता बॅनर्जींना सल्ला देताना त्यांनी म्हटले कि, राजकारण फुटबॉलचा सामना नाही, इथे सतत लोकांची सेवा करावी लागते. त्यामुळे आता मायावती यावर काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.