अमर सिंहांचं बॉलिवूडसोबत होतं ‘कलरफुल’ कनेक्शन, अभिनेत्री जया प्रदांना बनवलं थेट खासदार ! जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील समाजवादी पार्टीचे माजी नेते अमर सिंह यांचं नुकतच निधन झालं आहे. सिंगापूर येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना त्यांनी जगाचा निरोप घेतला. अमर सिंह यांची खास बात अशी की, त्यांचं कार्पोरेट आणि बॉलिवूड वर्ल्ड सोबत एक खास नातं राहिलं आहे. या नात्यामुळंच ते कायम चर्चेत राहिले आहेत.

विशेष बाब अशी की, दिल्लीतल्या सत्तेच्या वर्तुळात त्यांचं नाव असल्यानं सगळ्याच क्षेत्रातले दिग्गज त्यांच्यासोबत मैत्री करत असत.

दिग्गज अभिनेत्री जया प्रदा आणि त्यांच्या नात्याबद्दलही कायम चर्चा होत असे. जया प्रदा यांना त्यांनीच उत्तर प्रदेशातून राज्यसभेवर निवडून आणलं होतं.

अभिनेत्री जया बच्चन यांनाही अमिर सिंह यांच्यामुळंच समाजवादी पक्षाची राज्यसभेची उमेदवारी मिळाली होती.

एक वेळ अशी होती जेव्हा बॉलिवूड स्टार बिपाशा बसू आणि अमर सिंह यांचं संभाषण सोशलवर व्हायरल झालं होतं आणि यावरून वादही निर्माण झाला होता.

बॉलिवूडचे मेगास्टार बिग बी अमिताभ बच्चन आणि अमर सिंह यांचाही वाद झाला होता. परंतु नंतर पुन्हा त्यांच्यात समेट झाला. बिग बी अमिताभ सोबत आपलं भावाचं नातं आहे असंही ते सांगत असत.

अमर सिंह यांनी बॉलिवूडमधील सर्व दिग्गजांना घेऊन उत्तर प्रदेशात अनेक कार्यक्रम करवून घेतले होते.

अमर सिंह हे तितकेच हळव्या मनाचे नेते होते. दिग्गज स्टार श्रीदेवीचं जेव्हा निधन झालं होतं तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. श्रीदेवी सारख्या कलाकाराला कधीच विसरणार नाही अशी प्रतिक्रियादेखील त्यांनी दिली होती.

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like