अमरनाथ यात्रेच्या नावनोंदणीला सुरुवात ! 28 जूनपासून ‘हर हर महादेव’चा जयघोष घुमणार, जाणून घ्या रजिस्ट्रेशनची प्रक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   28 जून 2021 पासून पवित्र अमरनाथ यात्रेला सुरुवात होणार आहे. 6 लाख भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पहलगाम आणि बालताल अशा दोन्ही मार्गांवरून होणारी यात्रा आषाढ चतुर्थीला सुरू होऊन 22 ऑगस्टला श्रावण पौर्णिमेला म्हणजे रक्षाबंधनाच्या दिवशी संपेल. कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळं गतवर्षी अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली होती. पुन्हा आता या यात्रेला सुरुवात होत आहे.

अमरनाथ यात्रेसाठी नावनोंदणीला सुरुवात झाली आहे. पंरतु यासाठी अधिकृत वैद्यकीय प्रमाणपत्राची अट ठेवण्यात आली आहे. 13 वर्षांखालील बालके, 75 वर्षांवरील व्यक्ती आणि 6 महिन्यांपेक्षा जास्त गरोदर असणाऱ्या महिलांना यासाठी नावनोंदणी करता येणार नाही. नोंदणीसाठी http://shriamarnathjishrine.com/ या वेबासाईटला भेट द्यावी लागणार आहे. जम्मूमध्ये भाविकांना राहण्यासाठीबेस कॅम्प तयार केले जातात.

गेल्या काही वर्षांतील यात्रेकरूंची संख्या (आकडेवारी लाखात)

1) 2015 – 3.52

2) 2016 – 2.20 (याच वर्षी दहशतवादी बुऱ्हाण वणी चकमकीत मारला गेल्यानंतर परिस्थिती खराब झाली होती.

3) 2017 – 2.60

4) 2018 – 2.85

5) 2019 – 3.50

6) 2020 – कोरोनाच्या पार्श्वभीमीवर यात्रा रद्द