Amarnath Yatra Canceled | अमरनाथ यात्रा कोरोना महामारीमुळे लागोपाठ दुसर्‍यांदा झाली रद्द, भक्तांसाठी ऑनलाइन होणार आरती

श्रीनगर : वृत्तसंस्था – देशातील सध्याच्या कोविड (Covid-19) स्थितीमुळे, जम्मू आणि काश्मीर सरकारने (Government of Jammu and Kashmir) वार्षिक अमरनाथ यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. श्राईन बोर्डने म्हटले की, पवित्र गुहेवर सर्व प्रकारचे पारंपारिक धार्मिक विधी पहिल्या प्रमाणेच केले जातील. या निर्णयाची घोषणा जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी श्राईन बोर्डसोबत चर्चा केल्यानंतर केली. मात्र, भक्तांसाठी आरतीची सुविधा ऑनलाइन दिली जाईल. महामारीमुळे अमरनाथ यात्रा रद्द (Amarnath Yatra Canceled) होण्याचे हे लागोपाठ दुसरे वर्ष आहे. Amarnath Yatra canceled for a second time due to covid pandemic – online aarti for devotees

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

यापूर्वी जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी शुक्रवारी म्हटले होते की, सरकार लवकरच वार्षिक अमरनाथ तीर्थयात्रा आयोजित करण्याबाबत निर्णय घेईल, परंतु सोबतच हे सुद्धा स्पष्ट केले की लोकांचा जीव वाचवण्यास सर्वोच्च प्राधान्य असेल.

हिमालयाच्या (Himalayas) ऊंच भागात 3,880 मीटर ऊंचीवर असलेल्या भगवान शंकराच्या गुहा मंदिरासाठी 56-दिवसांची यात्रा अगोदर 28 जूनला पहलगाम आणि बालटाल मार्गाने सुरू होणार होती आणि ही यात्रा 22 ऑगस्टला समाप्त होणार होती.
परंतु आता ती रद्द करण्यात आली आहे. 2020 मध्ये सुद्धा महामारीमुळे तीर्थयात्रा रद्द केली होती.

Web Titel :  Amarnath Yatra canceled for a second time due to covid pandemic – online aarti for devotees

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PF News | कोरोना काळात नोकरी गमावणार्‍या कर्मचार्‍यांचे PF चे योगदान मार्च 2022 पर्यंत देणार सरकार

LPG ग्राहक असा बदलू शकतात आपला डिस्ट्रीब्युटर, सिलेंडर आणि रेग्युलेटर जमा करावा लागणार नाही, शुल्कही नाही